घरटेक-वेककेवळ '१' रुपयात विकत घ्या, Honor 8 Pro फोन

केवळ ‘१’ रुपयात विकत घ्या, Honor 8 Pro फोन

Subscribe

३० हजार रुपयांचा Honor 8 Pro फोन केवळ १ रुपयांत विकत घेण्याआधी, या खास ऑफरविषयी सविस्तर जाणून घ्या.

गॅजेट निर्मिती करणाऱ्या ‘ऑनर’ या अग्रगण्य कंपनीने गेल्यावर्षी Honor 8 Pro हा फोन लाँच केला होता. लाँचिंगच्यावेळी या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये इतकी होती. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे तुम्ही आजच्या दिवशी हाच ३० हजारांचा फोन केवळ १ रुपयाच खरेदी करु शकणार आहात. ऑनर इंडियाच्या वेबसाईटवर आज ग्राहकांसाठी खास ‘फ्लॅश’ सेल देण्यात आला आहे. या सुपर सेलअंतर्गत तुम्ही Honor 8 Pro केवळ १ रुपयांत विकत घेऊ शकणार आहात. मात्र, सहाजिकच हा प्रियिअम स्मार्टफोन १ रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही नियमही लागू केले आहेत. जाणून घ्या, नक्की काय आहे ही विशेष ऑफर :

हेही वाचा : Oppo ए५ भारतामध्ये लाँच

 

- Advertisement -

ऑफरची सविस्तर माहिती

Honor 8 Pro च्या या खास ऑफरचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम ऑनर इंडियाच्या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला तुमचं अकाउंट रजिस्टर करावं लागेल. रजिस्टर केल्यानंतर लगेचच  Honor 8 Pro फोनला Add to Cart करा. त्यानंतर तुम्ही या फोनसाठी बुकिंग करु शकता.

Honor 8 Pro चे फीचर्स :

5.7 इंचाचा क्यूएचडी डिस्प्ले

- Advertisement -

किरीन 960 प्रोसेसरसह 6 GB चा रॅम

128 GB चं इंटरनल स्टोरेज, 256 GB पर्यंत एक्सपांडेबल

अँड्रॉईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम

4 हजार mah क्षमतेची बॅटरी

LED फ्लॅशसह १२ मेगापिक्सलचे फ्रंट अँड बॅक असे दोन कॅमेरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -