5G सपोर्टसह Honor X10 लाँच, मिळणार पॉपअप सेल्फी कॅमेरा

Mumbai
Honor X10
5G सपोर्टसह Honor X10 लाँच

ऑनरने आपला नवीन स्मार्टफोन Honor X10 चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने हा फोन 5G सपोर्टसह लाँच केला आहे. याशिवाय या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, यात एक पॉपअप सेल्फी कॅमेरा आहे. Honor X10 Vmallवर तीन व्हेरिएंट्ससह उपलब्ध आहे. 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज, 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज, 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज या तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

Honor X10 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजची किंमत २०,२०० रुपये, 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजची किंमत २३,४०० रुपये आणि 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजची किंमत २५,५०० रुपये एवढी आहे. फोन लाइटस्पीड सिल्व्हर, प्रोबिंग ब्लॅक आणि रेसिंग ब्लू या तीन रंगांमध्ये आहे. चीनमध्ये फोनची विक्री २६ मेपासून सुरू होणार आहे.

Honor X10 स्पेसिफिकेशन

फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसह अँड्रॉइड 10 आधारित MagicUI3.1.1ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) देण्यात आली आहे. फोनमध्ये ६.६३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे ज्याचा रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर किरीन ८२० प्रोसेसर, 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. Honor X10 या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 40MPचा प्रायमरी कॅमेरा, 8MPचा दुसरा कॅमेरा आणि 2MPचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये पॉपअप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो 16MPचा आहे.


हेही वाचा – ४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला Huawei Y8p स्मार्टफोन लाँच


फोनमध्ये 5G सह 4G LTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, जीपीएस / ए-जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 4300mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनचं वजन २०३ ग्रॅम आहे.