घरटेक-वेकव्हॉट्सअॅप मेसेजस डिलीट झाले असतील तर हे वाचा

व्हॉट्सअॅप मेसेजस डिलीट झाले असतील तर हे वाचा

Subscribe

व्हॉट्सअॅप आपल्या जिवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. दररोज चॅटिंग, मीडिया फाईल्स शेअरिंग आणि व्हॉट्सअप कॉलचा वापर करुन आपण अनेक लोकांशी जोडले गेलो आहोत. मेसेजबरोबर अनेकदा महत्त्वाचा मजकूरही व्हॉट्सअॅपवर शेअर केला जातो. भविष्यात कधीही या मजकूराचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. मोबाईलची स्टोरेज मेमरी मर्यादित असल्याने सर्वच मेसेज आपण सेव्ह करु शकत नाही. त्यामुळे इच्छा नसूनही अनेकदा व्हॉट्सअॅपचे जुने मेसेज डिलीट करावे लागतात. मेसेज डिलीट करताना नकळत आपल्याकडून महत्त्वाचा असलेला मजकूर डिलीट होतो. अशावेळी मोबाईल वापरणाऱ्यांची गैरसोय होते. हा डिलीट केलेला मजकूर परत मिळवण्यासाठी अनेकजण मोबाईलच्या दुकानात जाऊन पैसे खर्च करतात. हे मेसेज परत मिळवायचे असल्यास पैसे खर्च करण्याची गरज नाही कारण पुढे दिलेल्या काही गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्हाला आपले डिलीट झालेले मेसेजेस पुन्हा मिळवता येणार आहेत.

असे करा मेसेजेस रिकव्हर
मेसेज परत मिळवण्यासाठी मोबाईलच्या व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जाऊन मेसेज बॅकअपचा ऑप्शन ऑन करावे. ऑन केल्यानंतर किती दिवसांनी या मेसेजचा बॅकअप हवा आहे, त्याची मर्यादा निवडावी. व्हॉट्सअॅपने फेसबुकशी टायअप केल्यामुळे आपण पाठवलेला सर्व मजकूर हा त्यांच्या डाटा स्टोरेजमध्ये सेव्ह होत रहातो. दररोज स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजता हा मजकूर त्यांच्या सर्व्हरमध्ये स्टोअर केला जातो. आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केले तरीही हा मजकूर मेन सर्व्हरमध्ये तसाच रहातो. आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप पुन्हा इन्स्टॉल करतेवेळी आपल्याला बॅकअप पुन्हा मिळवण्याचा पर्याय विचारण्यात येतो. त्यावेळी हो हा पर्याय निवडल्यास आपल्याला मेसेज पुन्हा मिळू शकतात.

- Advertisement -
transfer android whatsapp message
फोनवर दिसणारी व्हॉट्सअॅपची स्क्रीन

या स्टेप फॉलो करा

स्टेप १ – व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करा
स्टेप २ – मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन व्हॉट्सअप डाटाबेस किंवा बॅकअप फोल्डर ओपन करा.
स्टेप ३ – याठिकाणी असलेल्या “msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt7” ला रिनेम करुन “msgstore.db.crypt7” हे नाव द्या.
स्टेप ४ – व्हॉट्सअॅप पुन्हा इन्स्टॉल करा.
स्टेप ५ – इन्स्टॉल करतेवेळी रिस्टोअरचा पर्याय विचारल्यास Yes वर क्लिक करा.

- Advertisement -

(मोबाईल वापरणाऱ्याने व्हॉट्सअॅप बॅकअप हे फाईल मॅनेजरमध्ये इंटरनल किंवा एक्सटर्नल मेमरीत असू शकते हे लक्षात ठेवावे)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -