घरटेक-वेकTruecaller मधून तुमचा मोबाईल नंबर काढण्यासाठी हे वाचा

Truecaller मधून तुमचा मोबाईल नंबर काढण्यासाठी हे वाचा

Subscribe

Truecaller अॅप हे कॉलर आयडी सेवा देणारे प्रसिद्ध अॅप आहे. एखाद्या व्यक्तीचा नंबर आपल्याकडे नसल्यास आपण तो Truecaller अॅपवर शोधतो. पल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसलेला अनोळखी नंबरवरुन फोन आला तर तो नक्की कुणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी Truecaller आपल्या कामी येते. पण काहींना आपला नंबर या डेटाबेसमध्ये नको असतो. आपला नंबर फक्त आपल्या ओळखीच्या लोकांकडेच असावा, अशी अनेकांची अपेक्षा असते. आता तुम्ही तुमचा नंबर या डेटाबेसमधून काढून टाकू शकता.

Truecaller आपल्यासाठी मदतगार असले तरी आपल्या खासगी माहितीचा गैरवापर होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. एकदा का आपला नंबर Truecaller च्या डेटाबेसमध्ये अॅड झाला की तो डिलीट होत नाही. त्यानंतर तुम्ही तो फोन नंबर वापरणे बंद केले असेल तरी तुमचेच नाव त्या नंबरसाठी दाखवत राहते. यावर Truecaller कडून खुलासा करताना म्हटले आहे की, आमचे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध असल्यामुळे आम्हाला त्याचे नियम पाळावे लागतात. आम्ही आमच्या पार्टनर्सकडून, फोन डिक्शनरी, सोशल नेटवर्क आणि Truecaller कम्युनिटीकडून डेटा कलेक्ट करतो.

- Advertisement -

जर तुम्हाला Truecaller डेटाबेसमधून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता.

अँड्रईड प्लॅटफॉर्मवर हे करा

१. Truecaller अॅप चालू करा

- Advertisement -

२. Truecaller अकाऊंटवर लॉग इन करा

३. वरच्या कोपऱ्यात People असा आयकॉन आहे त्यावर क्लिक करुन Go to Setting मध्ये जावे.

४. About सिलेक्ट करा.

५. तिथे Deactivate पर्यायाला क्लिक करा

 

अॅपल प्लॅटफॉर्मवर हे करा

१. Truecaller अॅप चालू करा

२. Truecaller अकाऊंटवर लॉग इन करा

३. Gear आयकॉनवर क्लिक करा

४. About ला क्लिक करा

५. खाली स्क्रोल करुन Deactivate ला क्लिक करा.

याप्रकारे तुम्ही तुमचा नंबर ट्रूकॉलर अॅपमधून काढून टाकू शकता. यासोबतच तुम्ही Truecaller च्या अनलिस्ट पेजवर जाऊनही स्वतःचे नाव काढून टाकू शकता. https://www.truecaller.com/unlisting या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा नंबर आणि त्यापुढे देशाचा कोड टाकून डेटाबेसमधून बाहेर पडू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -