घरटेक-वेकपावसाळ्यात अशी घ्या गॅझेट्सची काळजी

पावसाळ्यात अशी घ्या गॅझेट्सची काळजी

Subscribe

पावसाळ्यात आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टी कशा नीट राहतील याकडे जास्त लक्ष देतो. सर्वात जास्त लक्ष आरोग्याची घेतो. आरोग्यानंतर सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली गॅझेट्स. तर पावसाळ्यात आपल्या या गॅझेट्सची काळजी कशी घ्यावी याविषयीच आपण जाणून घेऊया.

कशी घ्यावी काळजी?
⦁ पावसात सर्वात जास्त कोणती सांभाळून ठेवावी लागत असेल तर मोबाईल. मोबाईलसाठी प्लॅस्टिक कव्हर वापरावे. मोबाईल सांभाळून ठेवण्यासाठी पावसात कधीही पँटच्या खिशात न ठेवता बॅगेमध्ये ठेवावा. पाऊस पडत असल्यास मोबाईलवर बोलणे टाळावे आणि बोलायचेच असेल तर इअरफोन वा हेडफोन लावून बोलावे.
⦁ लॅपटॉप नेहमी बॅगेतच ठेवावा. लॅपटॉपला बाहेरून प्लास्टिकची पिशवी लावून मग बॅगेत भरून ठेवल्यास आत पाणी जाण्यापासून वाचेल.
⦁ कॅमेरा घेऊन जात असल्यास, त्याच्या लेन्सची जास्त काळजी घ्यावी. कव्हर नीट तपासून घ्यावे. तसेच कॅमेरा पूर्ण पिशवीत झाकून घ्यावा आणि मगच बॅगेत भरावा. लेन्ससाठी विशेष कव्हर मिळते त्याचा वापर करावा.

- Advertisement -

काळजी घेऊनही गॅझेट्स भिजल्यास काय करावं?
⦁ पाणी आत गेलं असल्यास, सर्वात पहिल्यांदा आपलं गॅझेट पूर्ण बंद करा. गॅझेटचे भाग सुटे करून घ्या. सुटे करण्यात आलेले भाग सुक्या, स्वच्छ आणि मऊसूत कपड्यावर ठेवा.
⦁ गॅझेट्स भिजल्यास कधीही हेअर ड्रायरचा वापर करू नये. त्यातील गरम हवा गॅझेट्ससाठी चांगली नसते. फोनचं कव्हर काढून तो तांदळामध्ये ठेवावा. तांदळात पुरून ठेवल्यावर डब्याचं झाकण लावून एक दिवस फोन त्यात ठेवावा. फोन सुकण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे.
⦁ तांदळातून मोबाईल बाहेर काढल्यावर लगेच चालू न करता, गॅझेट पूर्ण कोरडं झालं आहे का याची कापूस लावून खात्री करून घ्या. त्यानंतरच मोबाईल चालू करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -