घरटेक-वेकआयआयएफएल फायनान्सचा बॉण्ड बाजारात

आयआयएफएल फायनान्सचा बॉण्ड बाजारात

Subscribe

इंडिया इन्फोलाइन फायनान्स लिमिटेड (आयआयएफएल फायनान्स) या आघाडीच्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीने रिटेल गुंतवणूकदारांना १०.५ टक्के व्याजदर देणारा बॉण्ड सादर केला आहे. देशातील कोणत्याही बाँडपेक्षा हा अधिक दर आहे.

इंग्लंडस्थित सीडीसी ग्रुपचे साह्य लाभलेल्या आयआयएफएल फायनान्सने सेक्युअर्ड आणि नॉन सेक्युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडीज) सादर केले आहेत. यातून एकूण २५० कोटी रुपये उभे केले जातील. यात १७५० कोटींपर्यंत (एकूण २००० कोटी)च्या ओव्हर सबस्क्रीप्शनला ग्रीन-शू पर्याय ठेवण्यात आला आहे. जनतेसाठी या समभागांची विक्री २२ जानेवारी २०१९ रोजी खुली झाली आणि ती २० फेब्रुवारीपर्यंत खुली राहील.

- Advertisement -

यात विक्री आधी बंद होण्याचा पर्याय आहे. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्वावर समभागांचे वाटप होईल. वैयक्तिक आणि इतर विभागांमध्ये मासिक किंवा वार्षिक पेमेंट स्वरुपावर १२० महिन्यांच्या कालावधीसाठी आयआयएफएल बाँड्स सर्वाधिक म्हणजे १०.५० टक्के वार्षिक व्याज देऊ करतो. तर, संस्थात्मक विभागात १०.३५ टक्केे असा व्याजदर आहे. ३९ आणि ६० महिने असेही कालावधीचे पर्याय आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -