घरटेक-वेकस्मार्टफोन बाजारपेठेमध्ये भारताचा क्रमांक तुम्हाला माहितेय?

स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये भारताचा क्रमांक तुम्हाला माहितेय?

Subscribe

स्नार्टफोनच्या बाजारपेठेमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यावेळी भारतानं अमेरिकेला देखील मागे टाकलं आहे. तर, चीन अव्वल स्थानी आहे.

कोणता स्मार्ट फोन आहे रे तुझ्याकडे? काय फिचर्स आहेत तुझ्या स्मार्टफोनमध्ये? कोणत्या कंपनीचा नवा फोन येतोय रे बाजारात? काय किंमत आहे? ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल मेमरी. अशा एक ना अनेक चर्चा तुमच्या आमच्या मित्र – मैत्रिणीपासून ते नातेवाईकांमध्ये सुरू असतात. जमाना स्मार्ट फोन का है बॉस! स्मार्टफोन नसेल तर स्टेटसचा पण प्रश्न असतोच. अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर स्मार्टफोन आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. आता तुम्ही ऐवढे स्मार्ट फोन खरेदी करताय? मग स्मार्टफोन खरेदीमध्ये भारताचा कितवा नंबर लागतो याची तुम्हाला काही कल्पना आहे? या स्मार्ट फोनच्या बाजारपेठेमध्ये भारतानं अमेरिकेला मागे टाकत आता दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. जुलै – सप्टेंबर २०१८ याकाळात भारताने अमेरिकेला मागे टाकल्याचा अहवाल कॅनालिस या संस्थेने दिला आहे. या काळात भारतीय बाजारपेठेमध्ये ४.०४ कोटी स्मार्टफोन दाखल झाले. तर पहिल्या स्थानावर चीन असून चीनच्या बाजारपेठेमध्ये दाखल झालेले्या स्मार्ट फोनची संख्या ही १०.०६ कोटी आहे. तर अमेरिकेमध्ये ही संख्या ४ कोटी होती. पण भारतानं आता अमेरिकेला देखील मागे टाकलं आहे.

जगातील दहापैकी सात देशांमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. २०१५ नंतर ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच घट झाली आहे. इंडोनेशियामध्ये १३.२ टक्के वाढीसह ८९ लाख, रशियामध्ये ११.५ टक्के वाढीसह ८८ लाख आणि जर्मनीमध्ये २.४ टक्के वाढीसह ५५ लाख या तिन देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये देखील वाढ झाली आहे.  चीन आणि भारतामध्ये मात्र स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये अनुक्रमे १५.२ आणि १.१ टक्क्यांनी घट झाली आहे.

- Advertisement -

तर, स्मार्टफोनच्या उत्पादनामध्ये सॅमसंग पहिल्या नंबरवर आहे. सॅमसंगचा हिस्सा २०.४ टक्के आहे. त्यानंतर हुआवेई १४.९ टक्के, अॅपल १३.४ टक्के, शाओमी ९.६ टक्के आणि ओप्पो ८.९ टक्के या कंपन्यांचा नंबर लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -