घरटेक-वेकटीव्हीएसने आणली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल

टीव्हीएसने आणली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल

Subscribe

दुचाकी व तीनचाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर करून आपल्या कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारताचे रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत व टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष श्री. वेणू श्रीनिवासन यांच्या हस्ते या मोटरसायकलचे उदघाटन करण्यात आले.

टीव्हीएस मोटर कंपनीने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये टीव्हीएस Apache RTR 200 ४व्ही इथेनॉल ची संकल्पना मांडली होती. ही मोटरसायकल भारतात दाखल होत आहे. टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले की आज दुचाकी वाहन उद्योगक्षेत्र इलेक्ट्रिक, हायब्रीड व पर्यायी इंधन अशा सर्व विभागांमध्ये हरित व चिरस्थायी आधुनिक सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करत आहे. इथेनॉलवर चालणारी उत्पादने हा आमच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही दुचाकी उद्योगक्षेत्रातील क्रांती आहे. ही गाडी भारतात हरित भवितव्य घडवण्याचा ट्रेंड सुरु करेल.

- Advertisement -

अशी आहेत दुचाकीची वैशि्ष्ट्ये

इंधन म्हणून एथॅनॉलच्या वापरामुळे पेट्रोलियम आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल व देशाची ऊर्जा सुरक्षा वाढेल. तसेच या गाडीच्या वापरातून प्रदुषणही घटणार आहे. टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 वर इथेनॉल लोगोसोबत सुबकतेने घडवलेले ग्रीन ग्राफिक्स दिसतात. यामध्ये ट्वीनस्प्रेट्वीनपोर्ट ईएफआय तंत्रज्ञान आहे. गाडी चालवण्यात अधिक चांगली सुलभता, वेगवान थ्रोटल रिस्पॉन्स व उत्सर्जन पातळीमधील घट ही याची खासियत आहे. विविध प्रकारच्या स्थितींमध्ये ही गाडी अधिक चांगली शक्ती व अधिक चांगली कामगिरी देते. या मोटरसायकलची अतिशय प्रभावी सर्वात जास्त शक्ती ८५०० आरपीएमला २१ पीएस व टॉर्क ७००० आरपीएमला १८.१ एनएम आहे. ही गाडी दर तासाला १२९ किमी इतका सर्वात जास्त वेग गाठू शकते. ही स्पेशल एडिशन गाडी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक मध्ये १,२०,००० रुपये या आकर्षक किमतीला उपलब्ध करवून देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -