घरटेक-वेकअंतराळातून टिपला इनसाईट यानाचा फोटो

अंतराळातून टिपला इनसाईट यानाचा फोटो

Subscribe

इनसाईट या यानाने देखील त्याच्यासोबत असलेल्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने काही फोटो पाठवले होते.शिवाय मंगळावरील माती, मंगळावरील वाऱ्यांचा आवाज यानाने पाठवला आहे

नासाचे इनसाईट हे यान मंगळावर यशस्वी उतरले. या यानाने मंगळावरील फोटो पाठवायला सुरुवात केली आहे. पण हे यान अंतराळातून नेमके कसे दिसते ? याचा एक फोटो देखील नासाने शेअर केला आहे. अंतराळातून हे यान अगदी छोटेसे दिसत असून एका छोट्या ताऱ्याप्रमाणे हे यान दिसत आहे. नासाने या यानाचे फोटो ट्विट करुन शेअर केले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर नासाची मंगळ मोहीम अगदी जोरात सुरु आहे याचा अंदाज येतो.

- Advertisement -

अंतराळातून काढला फोटो

नासाचे इनसाईट हे यान मंगळाच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करण्यासाठी मंगळावर गेले आहे. नासा या यानाच्या हालचालीवर नजर ठेवून आहे. मंगळाच्या कक्षेत असलेल्या यानाने इनसाईट या यानाचा अंतराळातून फोटो काढला आहे. या याधी देखील यानाला ६ डिसेंबर रोजी या यानाने टिपले होते. मंगळावर हे यान एक उद्दिष्ट घेऊन गेले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा आणि मंगळग्रहावरील इतर बाकराव्यांचा अभ्यास हे यान करणार आहे.

वाचा-पाहा मंगळावर काढलेला पहिला ‘सेल्फी’

मंगळाचे या आधीही पाठवले फोटो

इनसाईट या यानाने देखील त्याच्यासोबत असलेल्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने काही फोटो पाठवले होते.शिवाय मंगळावरील माती, मंगळावरील वाऱ्यांचा आवाज यानाने पाठवला आहे. आता या यानाचाच फोटो अंतराळातून काढण्यात आले आहेत.

ऐका ‘मंगळा’वरील आवाज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -