घरटेक-वेकInstagram युजर्ससाठी खुशखबर!

Instagram युजर्ससाठी खुशखबर!

Subscribe

हॅकिंग किंवा डेटा लिकचं वाढतं प्रमाण लक्षात घेता, इन्स्टाग्रामने युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे नवं पाऊल उचललं आहे.

सोशल मीडिया अकाउंट्सचं मोठ्याप्रमाणात होणारं हॅकिंग तसंच डेटा लिकचे वाढते प्रकार लक्षात घेत, सोशल मीडिया साईट्सकडून अनेक सुरक्षा योजना राबवल्या जातात. याच पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामही एक नवी प्रणाली विकसीत करत आहे. गुगल आणि फेसबुक पाठोपाठ इन्स्टाग्रामही टू-फॅक्टर ऑथंटिकेशनच्या प्रणाली विकसीत करत आहे. युजर्सच्या प्रायव्हसीच्या दृष्टीने हे फिचर विकसीत करण्यात येत आहे. टू-फॅक्टर ऑथंटिकेशनमुळे तुमचं इनस्टाग्राम अकाउंट सुरक्षित राहणार आहे. विशेष म्हणजे, ही प्रणाली लागू झाल्यानंतर तुमचा Login आय.डी. आणि पासवर्ड अन्य कोणाला समजला, तरीही ती व्यक्ती तुमचं अकाउंट वापरु शकणार नाही.

टू-फॅक्टर ऑथंटिकेशन म्हणजे ?

समजा तुम्ही एका फोनमधून तुमचं अकाउंट लॉग इन करुन वापरत आहात. मात्र, त्याचवेळी अन्य कुणीतरी दुसऱ्या फोनवरुन तुमचाच लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरुन, तुमचं अकाउंट सुरु करण्याचा प्रयत्न केला तर लगेचच तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक कोड येईल. हा कोड ज्याच्याकडे असेल तीच व्यक्ती अकाउंटमधून लॉग इन करु शकेल. यामुळे सहाजिकच ज्याचं मूळ (original) अकाउंट आहे तीच व्यक्ती लॉग इन करु शकेल. तर जी व्यक्ती चोरुन लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल, तिच्या मोबाईलवर ऑथंटिकेशन कोड न गेल्यामुळे तिचे प्रयत्न असफल ठरतील. या प्रणालीमुळे तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट अधिक सुरक्षित होईल.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -