घरटेक-वेकआयफोन ११ ची उत्सुकता संपणार; १० सप्टेंबरला होणार लाँच

आयफोन ११ ची उत्सुकता संपणार; १० सप्टेंबरला होणार लाँच

Subscribe

सप्टेंबरमध्ये आयफोन ११ लाँच होण्याची शक्यता

अॅपलच्या नव्या आयफोनची वाट पाहणं आता संपणार आहे. युजर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार असून सप्टेंबरमध्ये आयफोन ११ लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपल कंपनीने यंदाच्या कार्यक्रमासाठी मीडियाला निमंत्रण पाठवण्यास सुरूवात केली आहे. १० सप्टेंबर रोजी स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान ‘आयफोन ११’ची घोषणा करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हे तीन आयफोन होणार लाँच

मागील काही महिन्यांपासून आयफोन ११ फोनच्या फिचर्सची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यासोबत आयफोन स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची माहिती देखील लीक झाली आहे. अॅपलच्या कार्यक्रमादरम्यान तीन आयफोन्स लाँच केले जाणार असून Apple Watch 4चे अपग्रेड व्हर्जन लाँच करण्यात येणार आहे. यासह या कंपनी hone XS,’आयफोन ११ एक्स मॅक्स’ आणि ‘आयफोन एक्सआर’चा अपग्रेडेड वेरियंटदेखील लाँच करण्यात येणार आहे.

ट्रिपल रिअर कॅमेरासह नवीन आयफोन

‘आयफोन ११ एक्स मॅक्स’ आणि ‘आयफोन एक्सएक्स’मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. तसेच ‘आयफोन एक्सआर’च्या अपग्रेटेड व्हर्जनमध्ये ड्यूएल कॅमेरा सेटअप बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

आयफोनच्या बॅटरीची क्षमता

इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे झाले तर आयफोन ११ मध्ये A13 प्रोसेसरसह असणार आहे. तीन्ही डिव्हाइसपेक्षा नव्या आयफोनच्या तुलनेत उत्तम बॅटरी देण्यात येणार आहे. ‘आयफोन एक्सएस’ आणि ‘एक्सएस मॅक्स’मध्ये OLED डिस्प्ले आणि ‘आयफोन एक्सआर’मध्ये एलसीडी डिस्प्ले देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -