बॅडन्यूज; आयफोन युजर्ससाठी बॅडन्यूज!!!

नियमांचं उल्लंघन केल्यानं आता आयफोन धारकांना व्हॉटसअॅप स्टिकर अॅप वापरता येणार नाही. आयफोननं त्यावर बंदी घातली आहे.

Mumbai
iphone

सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती व्हॉटसअॅप स्टिकरची. युजर्सना खिळवून ठेवण्यासाठी व्हॉटसअॅप नवनवीन फिचर आणत असते. त्यातील सध्या चर्चेत असलेलं आणि युजर्सच्या पसंतीला उतरलेलं नवं फिचर म्हणजे व्हॉटसअॅप स्टिकर. सर्व जण सध्या व्हॉटसअॅप स्टिकरच्या प्रेमात पडल्याचं पाहायाला मिळत आहे. पण, आयफोन युजर्ससाठी मात्र एक बॅडन्युज आहे. सध्या लोकप्रिय झालेले व्हॉटसअॅप स्टिकर अॅप मात्र आयफोन युजर्सना वापरता येणार नाही. अॅपल कंपनीनं या अॅपवर बंदी घातली आहे. आता यामागे फेसबुकचा वाद नसून नियम भंग केल्याने अॅपलनं हे अॅप अॅप स्टोअरमधून काढून टाकले आहे. स्टीकर फिचर आल्यानंतर थर्डपार्टी कंपन्यांनी हे अॅप प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअरवर आणले. त्यामुळे युजर्सनी स्टिकर अॅप मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड देखील केले. शिवाय स्वत:चा फोटो वापरून स्टिकर देखील तयार करता येतो. त्यामुळे त्याला जास्त पसंती मिळाली. पण नियमांचं उल्लंघन केल्यानं अॅपस्टोअरवरून स्टिकर अॅप हटवण्यात आले आहे. WABetaInfoनं याबाबतची माहिती दिली आहे. यावर व्हाट्सअॅपने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र फेसबुक आणि अॅपलचे सीईओंमध्ये झालेल्या वादानंतर हे पाऊल उचललं गेल्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here