घरटेक-वेकआयफोनची निर्मिती भारतात होणार

आयफोनची निर्मिती भारतात होणार

Subscribe

जगभर प्रसिद्ध असलेली अमेरिकेची कंपनी अ‍ॅपल लवकरच आपले आयफोन आता भारतात तयार करणार आहे. नवे iPhone XS, XS Max आणि XR यांची निर्मिती भारतात होणार आहे. अ‍ॅपल कंपनी आता चीनमधून आपले फोन निर्मिती काढून घेण्याचा विचार करत आहे.

कंपनी भारतात स्मार्टफोन्सची निर्मिती करणार ज्यामुळे आयफोनच्या किमतींमध्ये घट करता येणार. फोनचे दर कमी झाल्याने आयफोनच्या विक्रीमध्येही वाढ होऊन कंपनीला फायदा होणार आहे, असे सांगण्यात येत आहे.अ‍ॅपल सप्लायर फॉक्सकॉनने सांगितले आहे की, कंपनी लवकरच भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिटची प्लानिंग करणार. असेही सांगण्यात येत आहे की, चायनाच्या मॅन्युफॅक्चरिंग बेसला शिफ्ट करायची पण प्लानिंग करत आहे. एका रिपोर्टनुसार फॉक्सकॉनचे वरिष्ठ अधिकारी आणि चेअरमन Terry Gou लवकरच भारतात येऊन यासंदर्भात चर्चा करणार आहेत. भारत व्हिस्ट्रॉनद्वारे पूर्वीपासूनच iPhone 6S आणि iPhone SE असेम्बल करण्यात येतात. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अ‍ॅपलच्या हाय-एन्ड आयफोन व्हिस्ट्रॉनऐवजी फॉक्सकॉनद्वारे बनवण्यात येणार.

- Advertisement -

Apple तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदूर स्थित आपल्या लोकल असेम्बलिंग युनिट Foxconn ला मॉडेल्सचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बनवू शकते, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरू होती की, तायवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर कंपनी लवकरच प्रॉडक्ट्सची असेम्बलिंग सुरू करणार आहे. Foxconn च्या विस्ताराने भारतात २५ हजार नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -