ग्राहकांसाठी खास जावा मोटरसायकलने सुरू केली नवी सेवा

New Delhi
Jawa’s delivery estimator updated on website
ग्राहकांसाठी खास जावा मोटरसायकलने सुरू केली नवी सेवा

ग्राहकांच्या सोयीसाठी जावा मोटरसायकलने नवी सेवा सुरू केली आहे. ग्राहकांच्या शानदार प्रतिसादामुळे या बाईकची मागणी प्रचंड वाढली आहे. मागणी वाढल्यामुले गाडीसाठी वेटिंग पिरेड ८ ते १० महिन्यांवर पोहोचला आहे. म्हणून ग्राहकांना बाईकची खरेदी करण्यासाठी सोयीस्कर जावे यासाठी कंपनीने Delivery Estimator ही सेवा सुरू केली आहे. याद्वारे गाडी खरेदी केल्यानंतरची सगळी माहिती उपलब्ध होणार आहे.

‘का’ सुरू केली ही नवी सेवा?

ग्राहकांकडून आतापर्यंत बाइकची डिलीव्हरी मिळालेली नाही म्हणून कंपनीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे कंपनीने Delivery Estimator सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बाइकसाठी २८ डिसेंबर २०१८ पूर्वी नोंदणी केलेल्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. २८ डिसेंबरनंतर बुकिंग केलेल्यांना याचा लाभ घेता येणार नाही. कंपनीच्या संकेतस्थळावर फोन नंबर आणि बुकिंग आयडी टाकल्यास बाइकच्या डिलिव्हरीबाबत सर्व प्रकारची माहिती मिळेल. कंपनीकडून ही नवी सेवा दुसऱ्यांदा सुरू करण्यात आली आहे. भारतात जावाची प्रचंड लोकप्रिय असलेली बाइक भारताच्या बाजारात दाखल झाली आहे. आयुष्यभर साथ देईल असं या बाइकचं वैशिष्ट्य सांगण्यात आले आहे.

जावा बाइकची किंमत

जावा पेराक – १.८९ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली)
जावा ४२ – १.५५ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली)
दी जावा १.६४ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली)