‘या’ अॅपमुळे दहा लोकांशी एकाचवेळी बोलता येणार

या अॅपचे नाव 'Jio Group Talk'असून या अॅपचा वापर करून युजर्स VoLTE वर ग्रृप कॉन्फरन्स कॉल १० व्यक्तींशी बोलू शकतात.

mumbai
'या' अॅपमुळे दहा लोकांशी एकाचवेळी बोलता येणार

रिलायंस जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नव नवीन सेवा-सुविधा लॉंच करतात. परंतु जिओने असे एक कमालीचे अॅप्लीकेशन आणले आहे, त्यामुळे तुम्ही एकाच वेळी १० लोकांशी संवाद साधू शकणार आहे. या अॅपचे नाव ‘Jio Group Talk’असून या अॅपचा वापर करून युजर्स VoLTE वर ग्रृप कॉन्फरन्स कॉल १० व्यक्तींशी बोलू शकतात.

जिओ ग्राहकांनाच लाभ

‘Jio Group Talk’ या अॅपमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहे. हे अॅप मोबाइलमध्ये असणाऱ्या एचडी वॉईस कॉलिंगला देखील सपोर्ट करणार आहे. परंतु या सेवेचा फायदा त्याच युजर्सना घेता येईल, ज्यांच्याकडे जिओचे सिमकार्ड असेल. या अॅपचा वापर अॅन्डरॉईड तसेच, iOS युजर्संना करता येणार आहे.

एकावेळी १० लोकांशी बोलणे शक्य

रिलांयन्सने ‘Jio Group Talk’ या अॅपच्या माध्यमातून न टच मल्टी पार्टी कॉलिंग करण्याची सुविधा दिली आहे. एक ग्राहक एकावेळी जास्तीत जास्त १० लोकांशी जोडला जाऊ शकतो. कॉल करणारा व्यक्तीच इतरांना संवादात जोडू शकतो किंवा बाहेर काढू शकतो. तसेच काही माणसांचे बोलणे म्यूट देखील करू शकतो. जिओने सध्या फक्त वॉईस कॉलिंग ही सुविधा दिली आहे. परंतु लवकरच यात व्हिडिओ कॉलिंग आणि चॅटींगची सुविधा देखील देण्यात येणार आहे.

calling App चा असा करा वापर

1) स्मार्ट फोन आणि जिओचे सिमकार्ड मोबाईल युजर्सकडे असणे आवश्यक आहे.

2) आपल्या स्मार्टफोन मधून गूगल प्ले स्टोरवर जाऊन Jio Group Talk App शोधा.

3) जिओ नंबर वरून साइन इन करून एक OTP द्वारे व्हेरिफिकेशन करावे लागेल.

4) रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पुर्ण झाल्यावर या अॅपचा वापर करता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here