घरटेक-वेकलॅक्मे फॅशन वीक समरमध्ये ‘थेट शेतातून’ कॉन्सेप्ट

लॅक्मे फॅशन वीक समरमध्ये ‘थेट शेतातून’ कॉन्सेप्ट

Subscribe

वूलमार्क कंपनीने लॅक्मे फॅशन वीक समर -रिसॉर्ट २०१९ मध्ये थेट शेतातून फॅशनपर्यंत खास कलेक्शन सादर करण्यासाठी हस्तकलेतून फॅशन घडवणारे प्रीमियम लेबल पेरो व कुल्लूमधील लोकर विणकरांची सहकारी संस्था भुट्टीको यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.

ही या त्रिकुटाची पहिलीच भागीदारी असून त्यांनी हाताने विणलेले व हाताने बनवलेले उंची कपडे असलेले कलेक्शन बनविले आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन मेरिनो लोकर वापरली गेली आहे. भारतातील विणकरांची महान परंपरा या कलेक्शनमधून सादर केली जाणार आहे. ही भागीदारी म्हणजे वूलमार्क कंपनीच्या ‘ऑस्ट्रेलियामध्ये उगवलेले व भारतात बनवलेले’ या उपक्रमाचा एक हिस्सा आहे. पेरोच्या खास स्टाईल्समधून हाताने बनवलेले मेरिनो लोकरीचे कपडे यामध्ये दिसतील.

- Advertisement -

या कलेक्शमध्ये निळा, खाकी व ऑफ-व्हाईट या रंगांचा मेळ साधला गेला आहे. पेरोच्या डिझायनर अनीथ अरोरा यांनी भुट्टीकोसोबत मिळून या कलेक्शनच्या निमित्ताने पहिल्यांदाच मेरिनो लोकरीच्या बाबतीत एक्सट्रा वेफ्ट विविंग तंत्रज्ञान वापरले आहे. मेरिनो लोकर ही १०० टक्के नैसर्गिक, नूतनीकरणीय, जैविक पद्धतीने विल्हेवाट लावण्याजोगे फायबर असून अरोरांनी तिचा खास वापर केला आहे. स्थानिक लोक ही पेरोच्या डिझायनरची प्रेरणा असून त्यांची डिझाइन्स जगभरातील १३० स्टोर्समध्ये उपलब्ध आहेत. कुल्लूमध्ये मेरिनो लोकरीच्या वापराने आधुनिक फॅशनचे कपडे बनवून भुट्टीकोने पारंपरिक हॅन्डलूम क्षेत्रात अग्रणी स्थान मिळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -