घरटेक-वेकSamsung Galaxy S10 5G: जगातील पहिला 5G स्मार्टफोन दक्षिण कोरियाने केला लाँच

Samsung Galaxy S10 5G: जगातील पहिला 5G स्मार्टफोन दक्षिण कोरियाने केला लाँच

Subscribe

दक्षिण कोरियामध्ये ५ एप्रिलपासून हा 5G स्मार्टफोन आहे विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

सॅमसंगने जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्ड लाँच केल्यानंतर आता 5G अँड्रईड फोन आणला आहे. सॅमसंगने आपल्या एस सिरिजचा 5G स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस १० ५जी (Samsung Galaxy S10 5G) दक्षिण कोरियामध्ये लाँच केले आहे. दक्षिण कोरियाने प्रथमच 5G सेवा व्यवसायिक पातळीवर सुरूवात केली आहे. ५ एप्रिलपासून दक्षिण कोरियामध्ये हा 5G स्मार्टफोन आहे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच, सॅमसंगने 5G स्मार्टफोन्सना इतर देशात विक्रीकरिता उपलब्ध व्हावे यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत प्रयत्नशील आहे. हा फोन कोरियामध्ये $१२०० (साधारण रूपये ८४०००) रूपयात लॉंच झाला आहे.

- Advertisement -

या स्मार्ट फोन्सची वैशिष्ट्य

परफॉर्मेंस

हा फोन Exynos 9820 ऑक्टाकोर प्रोसेसरवर असून फोनची इंटरनल स्टोरेज क्षमता 256GB आहे. या फोनची बॅटरी ४,५०० एमएएचची देण्यात आली आहे.

- Advertisement -

डिस्प्ले

सुपरफास्ट कनेक्टिविटीसह Samsung Galaxy S10 5G फोनला ६.७ इंच असणारा डायनॉमिक AMOLED एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ६ कॅमेरे असून मागील बाजूस ४ रिअर कॅमेरा आणि फ्रन्ट बाजूस दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत.

 

कॅमेरा

या फोनच्या सिस्टीममध्ये 12+16+12+0.038 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये १२ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा आणि ०.०३८ मेगापिक्सलचा 3D डेप्थ सेंसर आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -