घरटेक-वेकट्रिपल कॅमऱ्यासह Infinix S5 Lite भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स

ट्रिपल कॅमऱ्यासह Infinix S5 Lite भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

हा स्मार्टफोन फक्त ७ हजार ९९९ रूपयांत मिळणार

स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Infinix S5 Lite हा फोन लाँच केला आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवरील सेलवर हा फोन उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन फक्त ७ हजार ९९९ रूपयांत मिळणार असून या बजेटमध्य़े ग्राहकांना ट्रिपल रियर कॅमरा सेटअपसह पंच होल डिस्प्ले अशा युनिक फीचरची सुविधा मिळणार आहे. हा स्मार्टफोन Quetzal Cyan, Violet और Midnight Black या तीन रंगात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

- Advertisement -

ऑनलाईन खरेदी करताना मिळणार सवलत

Infinix S5 Lite सोबत फ्लिपकार्डवर अनेक ऑफर्सचा फाय़दा ग्राहकांना घेता येणार आहे. HDFC Bank च्या डेबिट कार्ड वापरून हा फोन खरेदी करताना १० टक्के कॅशबॅक सुविधा देण्यात येणार आहे. याशिवाय Axis Bank च्या क्रेडिट कार्डवर ५ टक्क्यांचे अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात येत आहे. Axis Bank Buzz क्रेडिट कार्डने पेमेंट करताना ५ टक्क्यांचे अधिकची सवलत देण्यात येत आहे.

हे आहेत Infinix S5 Liteचे फीचर्स

  • ६.६ इंच असणारा एचडी+सुपर सिनेमा डिस्प्ले
  • पंच-होल डिस्प्ले डिझाईन
  • ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल
  • माइक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने २५६ जीबीपर्यंत एक्सपेंड
  • Android 9 Pie ओएसवर आधारित या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी ४००० एमएएचची बॅटरी
  • १६ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक लो लाईट सेंसर
  • १६ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा

आता Redmi 8 खरेदी करू शकता फक्त २९९ रूपयात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -