Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर टेक-वेक जबरदस्त Nubia Watch झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जबरदस्त Nubia Watch झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

New Delhi
launch nubia watch with flexible display and esim support launched know price and features
जबरदस्त Nubia Watch झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nubia ने नुकताच आपला नवीन गेमिंग स्मार्टफोन Red Magic 5S चीनी बाजारात लाँच केला आहे. यासोबतच कंपनीने Nubia Watch बाजारात आणले आहे. या स्मार्टवॉचमध्ये ई-सिम सपोर्ट दिला गेला असून हे या वॉचचे खास फीचर आहे. शिवाय यामध्ये वापरलेली बॅटरी एकाच चार्जमध्ये ३६ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. सध्या हे स्मार्टवॉच फक्त चीनमध्ये उपलब्ध होईल. पण लवकरच कंपनी हे स्मार्टवॉच आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच करेल.

Nubia Watch किंमत

Nubia Watch ला ब्लॅक, ग्रीन आणि रेड कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. ५ ऑगस्टपासून चीनमध्ये हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे आणि त्याची किंमत १७९९ (Yuan) म्हणजे १९ हजार ३०० रुपये आहे. कंपनीने स्मार्टवॉचसह Bluetooth Accessoryदेखील आणल्या आहेत. यामध्ये नेक बँड गेमिंग हेडसेटचा समावेश आहे. त्याची किंमत ३९९ युआन (Yuan) म्हणजे सुमारे ४ हजार ३०० रुपये आहे. तसेच Red Magic Gamepad देखील लाँच केले आहे.

Nubia Watch के फीचर्स

Nubia Watchमध्ये फॅक्सिबल एमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टवॉचमध्ये सिलिकॉन स्ट्रेप आणि नापाच्या लेदर स्ट्रॅपचा पर्याय दिला आहे. यात ४.०१ इंच डिस्प्ले असून त्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 960 x 192 पिक्सल आहे. हा डिव्हाइस Qualcomm Snapdragon Wear 2100 प्लॅटफॉर्मवर काम करते. यामध्ये 1GB रॅम 8GB इंटरनल मेमोरी दिली आहे.

खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन ई-सिम सपोर्टसह आहे. यामुळे युजर्स कॉलिंग व्यतिरिक्त सोशल Apps आणि मोबाइल पेमेंट सारख्या सेवा मिळतील. Nubia Watch मध्ये युजर्स रियल टाईम हार्ट रेट मॉनिटरिंग, ऑटोमॅटिक एक्सरसाईज ट्रॅकिंग, स्लीप मॉनिटरिंग, म्युझिक प्लॅबॅक आणि असे अनेक फीचर्स यामध्ये दिले गेले आहेत. यामध्ये दिलेली 420mAh बॅटरी ३६ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे.


हेही वाचा – गुड न्यूज! Flipkartची डिलिव्हरी आता ९० मिनिटांत होणार!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here