घरटेक-वेकSamsung Galaxy A11 आणि A31 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

Samsung Galaxy A11 आणि A31 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए सीरिजचे आणखी दोन बजेट स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहे. दक्षिण कोरियन कंपनीने मागील आठवड्याच गॅलेक्सी ए२१एस (Galaxy A21s) लाँच केला होता. आता कंपनीने गॅलेक्सी ए२१ (Galaxy A11) आणि गॅलेक्सी ए३१ (Galaxy A31) थायलंडमध्ये लाँच केला आहे. कंपनी लवकरच हे नवीन बजेट स्मार्टफोन भारतात देखील लाँच करू शकते. चौथ्या लॉकडाऊन दरम्यान ई-कॉमर्स कंपनीना सूट मिळाल्याने स्मार्टफोन कंपनी आपले स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करू शकते. गॅलेक्सी ए११ (Galaxy A11) आणि गॅलेक्सी ए३१ (Galaxy A31) गेल्या वर्षी लाँच झालेल्या गॅलेक्सी ए१० (Galaxy A10) आणि गॅलेक्सी ए३० (Galaxy A30)चे अपग्रेड मॉडेल आहे.

गॅलेक्सी ए ३१ (Galaxy A31)चा लूक आणि डिझाईन यावर्षी कंपनीच्या सर्वाधिक विक्री असणार्‍या स्मार्टफोन गॅलेक्सी ए ५१ (Galaxy A51) प्रमाणेच आहे. या स्मार्टफोनच्या बॅकला क्वाड रियर कॅमेरा सेट-अप देण्यात आला आहे. तसेच 5,000mAh बॅटरी आणि 128GB पर्यंत स्टोरेज ऑप्शनसह लाँच करण्यात आला आहे. गॅलेक्सी ए११ (Galaxy A11) मध्ये 32GB स्टोरेज आणि 4,000mAh बॅटरीची क्षमता आहे. गॅलेक्सी ए३१ (Galaxy A31)ची सुरुवातीची थायलंडच्या चलनानुसार किंमत ८,९९९ बहट (जवळपास २१ हजार ३०० रुपये) आहे. तर गॅलेक्सी ए११ (Galaxy A11) ची सुरुवाताची किंमत ५,१९९ बहट (जवळपास १२ हजार ३००) रुपये आहे. गॅलेक्सी ए३१ (Galaxy A31)चे ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट या तीन रंगात तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. तर गॅलेक्सी ए११ (Galaxy A11) फक्त ब्लू रंगात उपलब्ध आहे.

- Advertisement -

गॅलेक्सी ए११ (Galaxy A11)चे फीचर्स जाणून घ्या 

गॅलेक्सी ए११ (Galaxy A11) ६.४ इंचाचा असून इन्फिनिटी -ओ एचडी डिस्प्ले पॅनेलसह आहे. ज्याचे रिझोल्यूझन 7000 x 1560 पिक्सल आहे. या फोनमध्ये Exynos 1.8GHz Octa-Core प्रोसेसर वापरला जातो. 2GB/3GB RAM आणि 32GB स्टोरेज ऑप्शन या फोनमध्ये आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे इंटरनल मेमरीला 512GB पर्यंत वाढविली जाऊ शकते.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेट-अप आहे. फोनच्या बॅकमध्ये 13MP प्राइपरी, 2MP सेकंडरी आणि 5MP तिसरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी यामध्ये 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. 4,000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग फीचर आहे. तसेच यात USB Type C चार्जिंग फीचर दिले आहे. Android 10 वर आधारित OneUI 2.0 वर चालत आहे.

- Advertisement -

गॅलेक्सी ए३१ (Galaxy A31)चे फीचर्स

गॅलेक्सी ए३१ (Galaxy A31) ६.४ इंच फुल एचडी + Infinity-U SuperAMOLED डिस्प्ले पॅनल आहे. याबरोबर डिस्प्लेच रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. हा स्मार्टफोनमध्ये 4GB/6GB RAM आणि 64GB/128GB
स्टोरेज ऑप्शन आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे इंटरनल मेमरीला 512GB पर्यंत वाढविली जाऊ शकते. हा स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P65 प्रोसेसर काम करते.

या फोनच्या बॅकला क्वाड रियर कॅमेरा सेट-अप देण्यात आला आहे. याचा प्राइमरी सेन्सर 48MP दिला आहे. याव्यतिरिक्त यामध्ये 8MP अल्ट्रा वाईड, 5MP डेप्थ सेन्सर, 5MP मॅक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी 20MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन Android 10 वर आधारित OneUI 2.0 रन करतो. तसेच 5,000mAh बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये दिले आहे. या फोनचे काही फीचर्स Galaxy A51 सारखे आहेत.


हेही वाचा – आता मोबाईल घेणे शक्य; Amazon, Flipkart ला रेड झोनमध्ये डिलिव्हरीची परवानगी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -