Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर टेक-वेक Samsung ने Galaxy M31s भारतात केला लाँच, जाणून घ्या शानदार कॅमेरा फिचर्स

Samsung ने Galaxy M31s भारतात केला लाँच, जाणून घ्या शानदार कॅमेरा फिचर्स

New Delhi
launch-samsung-galaxy-m31s-launched-in-india-at-rs-19499-with-64mp-quad-camera-and-6000mah-battery
Samsung ने Galaxy M31s भारतात केला लाँच, जाणून घ्या शानदार कॅमेरा फिचर्स

आज दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग (Samsung)ने आपला Galaxy M सीरिजचा दमदार स्मार्टफोन Galaxy M31s लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट Amazon Indiaवर एक्सक्लूसिव्ह सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. Galaxy M31 आणि Galaxy M21 नंतर या सीरिजचा तिसरा स्मार्टफोन यावर्षी भारतात लाँच झाला आहे. सॅमसंगच्या या नव्या Galaxy M31s स्मार्टफोनमध्ये कंपनीने दमदार 6,000mAh बॅटरीसह दमदार कॅमेरा फिचर दिले आहेत. हा फोन दोन कल ऑप्शन्स आणि दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सेलसाठी उपलब्ध असेल. या फोनचा लूक आणि डिझाईन Samsung Galaxy A51 प्रमाणे आहे.

किंमत आणि ऑफर्स

सॅमसंग Galaxy M31s कंपनीच्या दोन स्टोअरेज ऑप्शन्स 6GB RAM + 128GB आणि 6GB RAM + 256GBमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या बेस मॉडेलची किंमत १९ हजार ४९९ रुपये आहे. पण याची हाई अँड व्हेरिएंटची किंमत २१ हजार ४९९ रुपये आहे. हा स्मार्टफने ६ ऑगस्टपासून ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India व्यतिरिक्त सॅमसंग ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्स Samsung Opera House या ठिकाणाहून खरेदी करू शकता. हा फोन दोन ऑप्शन्स Mirage Blue आणि Mirage Black मध्ये खरेदी करू शकता

फीचर्स

सॅमसंग Galaxy M31s स्मार्टफोन ६.५ इंच फुल एचडी प्लस Infinity-O Super AMOLED डिस्प्ले पॅनलसोबत आहे. यामध्ये सेंट्रली अलाइंड पंच-होल दिले गेले आहेत. ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा बसवला आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ दिले आहेत. फोनच्या बॅकला क्वाड रियर कॅमेर सेटअप दिला आहे. या फोनचे प्रोसेसर Exynos 9611 SoC वर रन होत आहे. जो 8GB पर्यंत रॅम सपोर्ट करतो.

फोनच्या इंटरनल मेमरीला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. फोनमध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट दिला आहे. फोन ड्यूल 4GB सीम कार्ड सपोर्टसोबत येत आहे. यामध्ये VoLTE आणि WiFi Calling सारखे फीचर सपोर्ट करतात. तसेच फोनमध्ये USB Type C चार्जिंग फीचर 25W फास्ट चार्जिंगसह दिले आहे. शिवाय सिक्युरिटीसाठी फेस अनलॉकसह साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. ते पॉवर बटणासह इंडिग्रेटेड आहे. स्मार्टफोनमध्ये कॅमेरा 64MP Intelli-Cam फीचर दिले आहे. तसेच 64MP प्रायमरी सेंसर दिले आहे. याशिवाय फोनमध्ये 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर दिला गेला आहे. फोनमध्ये 5MP चा मॅक्रो आणि 5MP चा प्रोट्रेस सेंसर दिला गेला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 32MPचा कॅमेरा दिला गेला आहे. या फोनच्या कॅमेरामधून 4K शूट केले जाऊ शकतात.


हेही वाचा – जबरदस्त Nubia Watch झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here