घरटेक-वेकजबरदस्त फीचर्ससह Sony Xperia 5 II स्मार्टफोन झाला लाँच

जबरदस्त फीचर्ससह Sony Xperia 5 II स्मार्टफोन झाला लाँच

Subscribe

दीर्घ प्रतीक्षेनंतर सोनी Sony ने अखेर Xperia 5 II स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये बरेच खास फिचर्स देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त हे युजर्सना एक उत्तम गेमिंग अनुभव देखील देऊ शकते. हा स्मार्टफोन सध्या अमेरिका आणि यूएकेमध्ये लाँच करण्यात आला आहे. परंतु, इतर देशांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सिंगल स्टोरेजमध्ये देण्यात येणारा हा स्मार्टफोन युजर्स खूप कलरच्या ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात.

Sony Xperia 5 II किंमत

- Advertisement -

Sony Xperia 5 II सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनची किंमत EUR 899 म्हणजेच सुमारे ७८ हजार रुपये आहे. अमेरिकेत हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रे तीन कलरमध्ये उपलब्ध असेल. तर यूकेमध्ये हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध असेल. अद्याप कंपनीच्या साईटवर या स्मार्टफोनच्या विक्री तारीख जाहीर केलेली नाही आहे. परंतु काही अहवालात म्हटले आहे की, हा स्मार्टफोन ४ डिसेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल

Sony Xperia 5 II फिचर्स

- Advertisement -

Sony Xperia 5 II हा स्मार्टफोन Android 10 ओएसवर काम करतो आणि यामध्ये Snapdragon 865 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन १०८०x२५२० पिक्सल आहे आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. हे सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल पण मायक्रोएसडी कार्डचा वापर करून त्याचे स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

फोटोग्राफीसाठी Sony Xperia 5 II मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनचा प्रायमरी सेन्सर १२ एमपीचा आहे. तर १२ एमपी दुसरा सेन्सर आणि १२ एमपी व्हाइड अँगल लेन्स देण्यात आले आहेत. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4000mAh बॅटरी उपलब्ध असून ३० मिनिटांत या बॅटरीवर ५० टक्के चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -