लवकरच लिनोवाचे तीन स्मार्टफोन भारतात लाँच होणार

लिनोवा लवकरच भारतात तीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यामुळे लिनोवाच्या स्मार्टफोनची मोबाईल वापरकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

New Delhi
Lenovo-784x441
लिनोवाचे ३ स्मार्टफोन

मागील काही दिवसात लिनोवाचा कोणताच नवा स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आला नाही. पण लिनोवाचा मोबाईलची क्रेझ असलेल्या मोबाईल वापरकर्त्यांना लवकरच लिनोवाचे तीन स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहेत. ५ सप्टेंबर रोजी लिनोवाचे भारतात तीन स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन स्मार्टफोनकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Lenovo K10 Note सर्वसामान्यांच्या बजेटमधील

५ सप्टेंबर रोजी लिनोवो तीन स्मार्टफोन लाँच करत आहे. Lenovo Z6 Pro, Lenovo K10 Note आणि Lenovo A6 Note हे ते तीन स्मार्टफोन असणार आहेत. तीनही स्मार्टफोनच्या किंमती वेगवेगळ्या असतील. त्यातही Lenovo K10 Note हा स्मार्टफोन सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटमधील असेल. यापूर्वी चीनमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. या कॅमेरामध्ये ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

फोनला चार कॅमेरे

६.३९ इंचाच्या Lenovo Z6 Pro या स्मार्टफोनमध्ये अमोलेड फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या फोनची बॅटरी ४ हजार एमएएच क्षमतेची आहे. या स्मार्टफोनला चार कॅमेरे देण्यात आले आहेत. तर ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ६ जीबी रॅम देण्यात आलेल्या या फोनची किंमत लाँच नंतरच कळेल.