घरटेक-वेकLG कंपनीचा दमदार फोन, पाहा फिचर्स

LG कंपनीचा दमदार फोन, पाहा फिचर्स

Subscribe

थेट iPhone X ला टक्कर देणारा LG चा हा नवा LG V35 Signature फोन तुम्हालाही नक्कीच आवडेल.

मोबाईल फोन्सची क्रेझ तरुणांमध्ये काही कमी होताना दिसत नाहीये. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असलेले स्मार्टफोन्स मग ते कितीही महाग असू देत, दिवसागणीक त्यांची मागणी वाढतेच आहे. बाजारात विविध कंपन्यांचे महागडे फोन्स उपलब्ध असाताना LG कंपनीनेही एक दमदार स्मार्टफोन्स लाँच केला आहे. ‘LG V35 Signature edition 2018’ असं या मॉडेलचं नाव असून, या फोनची किंमत iPhone X पेक्षाही महाग आहे. जिथे iPhone X ची किंमत सुमारे १ लाख २ हजार रुपये आहे तिथे LG च्या या नव्या फोनची किंमत साधारण १ लाख २३ हजार रुपये इतकी आहे. या सिरिजमधील पहिलं मॉडेल LG ने मागील वर्षींच लाँच केलं होतं. आता थेट आयफोनला टक्कर देणारा हा नवा LG V35 फोन इतका महाग का ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र, LG कंपनीच्या म्हणण्यानुसार, LG V35 या फोनमधील भन्नाट फिचर्सच्या दृष्टीने ही किंमत अगदीच योग्य आहे. जाणून घेऊया, नेमके काय या आहेत LG V35 Signature edition फोनचे भन्नाट फिचर्स.

lg v35 signature edition

- Advertisement -

LG V35 फिचर्स :

  • फोनची संपूर्ण बॉडी Ziroconium ceramic ची. त्यामुळे फोनला स्क्रॅच न पडण्याचा कंपनीचा दावा
  • या खास सिग्नेचर एडिशनमध्ये ग्राहकांना फोनच्या पाठीमागे स्वत:चं नाल कोरुन घेण्याची सोय
  • फोनला ६ इंचाचा QHD आणि OLED डिस्प्ले. गोरिला ग्लास 5 ची सुरक्षा
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, फिंगरप्रिंट सेसंर
  • 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज – 2 टीबी एस्पांडेबल मेमरी
  • 16 मेगापिक्सलचे 2 बॅक कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  • क्वॉलकॉम Quick चार्ज 3.0 वायरलेस चार्जिंग सपोर्टसह, 3 हजार 300 mAh ची बॅटरी
  • कनेक्टिव्हीटीसाठीस – 3G, 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, VoLTE, USB टाइप C आणि NFC इत्यादी फिचर्स उपलब्ध

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -