घरटेक-वेक'९' कॅमेऱ्यांचा फोनने येणार फोटोग्राफीत अजून मजा

‘९’ कॅमेऱ्यांचा फोनने येणार फोटोग्राफीत अजून मजा

Subscribe

अमेरिकेतील एक डिजीटल फोटोग्राफी आणि कॅमेरा मेकर कंपनी आता चक्क ९ कॅमेरे असलेला फोन तयार करत आहे. हा फोन ६४ मेगापिक्सलचे फोटो घेऊ शकेल.

मोबाईल फोन आणि त्यांचे हाय रेझेल्युशन कॅमेरे याची क्रेझ सध्या तरुणांमध्ये मोठ्याप्रमाणावर आहे. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे मात्र, माहागडे प्रोफेशनल कॅमेरे विकत घेणं शक्य नाहीये असे हौशी लोक चांगल्या कॅमेराच्या मोबाईल्सकडे वळतात. सुरुवातील सिंगल कॅमेरा असलेल्या मोबाईल फोन्समध्ये कालांतराने फ्रंट कॅमेरा आणि ड्युएल कॅमेरा यासारख्या सुविधा विकसीत होत गेल्या आणि जगभरातील ग्राहकांची त्याला पसंती देखील मिळाली. अशाच कॅमेरा प्रेमीसांठी एक नवीन खुशखबर आहे. अमेरिकेतील एक डिजीटल फोटोग्राफी आणि कॅमेरा मेकर कंपनी आता चक्क ९ कॅमेरे असलेला फोन तयार करत आहे. हा फोन ६४ मेगापिक्सलचे फोटो घेऊ शकेल.
light's phone with 9 cameras
फोटो सौजन्य- light.co


‘लाईट’ची भन्नाट संकल्पना

अमेरिकेच्या लाईट या कॅमेरा बनवणाऱ्या कंपनीने ही अनोखी संकल्पनेवर काम करत आहे. या फोनमध्ये कॅमेरांच्या पाच ते नऊ लेंसेस असून तो प्रोटोटाईप स्वरुपाचा फोन असेल. यामध्ये ६४ मेगापिक्सल पर्यंतचे फोटो तुम्ही अगदी सहज घेऊ शकता. उत्तम फ्लॅशलाईट, अॅटजेस्ट करता येणारी प्रकाशक्षमता आणि हाय रेझिल्युशन कॅप्चर सिस्टीम अशी या फोनची वैशिष्ट्यं असतील. सध्या स्लिम आणि लाईट वेट फोन्सना अधिक मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर लाईट कंपनीचा हा नवा फोनही स्लिम असेल. आयफोन X पेक्षाही हा फोन स्लिम असल्याचं, लाईट कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
फ्लॅशलाईटसह एकूण ९ कॅमेरे असलेल्या या फोनची किंमत १ हजार ९५० डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख ३३ हजार ९०६ रुपये इतकी असेल. याआधी २०१५ साली लाईट कंपनीने १६ लेन्स असलेला ५२ मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा लाँच केला होता. दरम्यान भारतासह अन्य देशांमध्ये हा मोबाईल फोन कधी लाँच होणार, याबद्दल अद्याप कोणतीच घोषणा करण्यात आली नाहीये.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -