घरटेक-वेकGoogle Pay वरून करा कार्ड पेमेंट; अशी वापरा सुविधा

Google Pay वरून करा कार्ड पेमेंट; अशी वापरा सुविधा

Subscribe

डिजिटल पेमेंटमध्ये आता Google Pay नेही  प्रवेश केला आहे. गूगल पेवरून आता कार्ड पेमेंटची सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्यासंबंधी Google Pay ने नुकतेच अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक कार्ड्स या दोन महत्त्वाच्या कार्ड नेटवर्कशी सहकार्य करार केले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने या दोन बँकांच्या डेबिट कार्डवरून गुगल पे करता येईल. अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक या दोन्ही बँकांची कार्ड्स Google Pay च्या टोकनायझेशन या नव्या संकल्पनेला धरून काम करणार आहेत. ही पद्धत ग्राहक, व्यापारी यांना ऑनलाइन-ऑफलाइन व्यवहार अधिक सुरक्षितपणे करण्यास प्रोत्साहन देईल, असा विश्वास Google Pay आणि NBU प्रमुख साजित शिवानंदन यांनी व्यक्त केला आहे.

Google ने गेल्या वर्षी Google For India या कार्यक्रमात भारतात कार्डवरून पेमेंटच्या योजनेची घोषणा केली होती. तर आता त्यांनी या दोन बँकांशी करारही केला आहे. Google आता पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत आहे. आतापर्यंत Google Pay वापरणाऱ्यांजवळ बँक खात्याशी संबधित UPI हँडलचा उपयोगाचा पर्याय होता. मात्र, आता या सोबतच कार्ड पेमेंटचा पर्यायही उपलब्ध असेल.

- Advertisement -

अशी वापरा ही सुविधा

टोकनायझेशन ही कार्ड पेमेंटची एक नवीन पद्धत आहे. त्यामुळे या प्रकारचे व्यवहार अधिक सुरक्षित होतात. प्रत्येक कार्डधारकाची ओळख म्हणून कार्डवर १६ अंकी एक क्रमांक दिला असतो. व्हिसा कार्ड या अंकांना रँडम नंबरमध्‍ये बदलतं आणि त्यांना सेव्ह करतं. जेव्हा ग्राहक त्या कार्डचा उपयोग करतील तेव्हा व्हिसा कार्ड नंबरऐवजी व्यापाऱ्यांसोबत टोकन नंबर शेअर करतं. यात कार्ड नंबर त्यांना कळत नाही आणि व्यवहार अगदी सुरक्षितपणे पार पडतो. अशी ही टोकन व्यवस्था असणार आहे.

हेही वाचा –

यांना बळीराजाच्या करपलेल्या चेहऱ्याऐवजी दीपिकाचा चेहरा हवाय, म्हणूनच.. – राजू शेट्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -