घरटेक-वेकमारुती सुझुकीची 'ही' नवीन कार लाँच

मारुती सुझुकीची ‘ही’ नवीन कार लाँच

Subscribe

मारुती सुझुकी कंपनीने पुन्हा एकदा भारतीय बाजारात नवीन कार लाँच केली आहे. एमपीव्ही अर्टिगा BS6 ही कार अपडेटसह लाँच केली आहे. तसेच या नवीन अर्टिगाची किंमत सुमारे १० हजार रुपयांनी वाढविण्यात आली आहे. याआधी मारुती कंपनीने BS6 इंजिनसह स्विफ्ट, व‌ॅगनआर, अल्टो, बलेनो आणि डिजायर यासारख्या कार लाँच केल्या आहेत. ही सहावी कार मारुती सुझुकीची असली तरी ती BS6 इंजिनसह अपडेट केली आहे.

या नवीन मारुती सुझुकी BS6 अर्टिगाच्या बेस मॉडेलची टॉप ZXi ट्रिमची किंमत १०.०५ लाख आहे. तर LXi ट्रिमची एक्स शोरूम किंमत ७.५५ लाख आहे. या अगोदर या कारची किंमत ७.४४ लाख ते ९.९५ लाख रुपयांच्या दरम्यान होती.

- Advertisement -

मारुती सुझुकी BS6 अर्टिगा या कार बरोबर फॅक्ट्री-फिटोड सीएनजी किट असणारी अर्टिगा लाँच केली आहे. फॅक्ट्री-फिटोड अर्टिगाची किंमत ही ८.८७ लाख असणार आहे. या कारमध्ये VXi व्हेरिययंटमध्ये सीएनजीचा पर्याय देण्यात आला आहे. या अर्टिगा कारमध्ये K15B मध्ये १.५ लीटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि मॅन्युअल ट्रांसमिशनमध्ये देखील उपलब्ध आहे. तसेच या इंजिनची पॉवर 105 bhp असून 138NM टॉर्क देते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -