घरटेक-वेकMercedes-AMG GT R आणि AMG C 63 Coupe भारतात लाँच

Mercedes-AMG GT R आणि AMG C 63 Coupe भारतात लाँच

Subscribe

ऑटोमोबाईल क्षेत्रातील स्रवात मोठी जर्मनीची Mercedes-Benz (मर्सिडीज बेंझ) कंपनीने AMG मॉडेल भारतात लाँच केले आहेत. कंपनीने 2020 Mercedes-AMG GT R (2020 मर्सिडीज-एएमजी जीटी आर) आणि Mercedes-AMG C 63 Coupe (मर्सिडीज-एएमजी सी 63 कूप) या दोन कार भारतीय बाजारात आणल्या आहेत. या कारची नेत्रदीपक छायाचित्रे समोर आल्यानंतर कार प्रेमी या कारच्या लाँचची प्रतीक्षा करत होते. दोन्ही मॉडेल पूर्णपणे उत्पादित युनिट्स (सीबीयू) म्हणून भारतात आणले आहेत. नवीन जीटी आरला एक मिड-लाइफ अपडेट देण्यात आला आहे आणि सध्याच्या मॉडेलपेक्षा लूक आणि परिमाणांच्या बाबतीत फारसा वेगळा नाही आहे.

Mercedes-AMG GT R ची वैशिष्ट्ये

भारतातील नवीन Mercedes-AMG GT R (मर्सिडीज-एएमजी जीटी आर) ची किंमत २.४८ कोटी आहे. मर्सिडीजने नवीन एलईडी हेडलाइट्स आणि टेललाईट्ससह दिले आहेत. यात पुन्हा डिझाइन केलेले एक्झॉस्ट आणि रीअर डिफ्यूझर देखील आहे. कारच्या केबिनबद्दल सांगायचे तर नवीन AMG GT Rमध्ये नवीन स्टीयरिंग व्हील आणि १२.३ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. कारमध्ये १०.२५ इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट हेड-युनिट देखील आहे ज्यात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतं. Mercedes-AMG GT R मध्ये एक ४.० लिटर, दुहेरी-टर्बो व्ही 8 इंजिन आहे. हे इंजिन 577 BHP आणि 700 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 7-स्पीड ड्युअल-क्लच स्वयंचलित ट्रांसमिशन देण्यात आलं आहे. मर्सिडीजचा असा दावा आहे की AMG GT R ० ते १०० किलोमीटर प्रति तास केवळ ३.६ सेकंदात गती वाढवू शकते. या कारचा टॉप स्पिड ३१८ किमी/ताशी आहे. या कारमध्ये रीअर-व्हील स्टीयरिंग प्रमाणित आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ट्विटरने काढली ट्रम्प यांची चूक; ट्रम्प यांनी दिली ट्विटरला धमकी


Mercedes-AMG C 63 Coupe ची वैशिष्ट्ये

नवीन Mercedes-AMG C 63 Coupe (मर्सिडीज-एएमजी सी 63 कूप) ही एक 2-दरवाजाची कूप कार असून भारतात त्याची एक्स शोरूम किंमत १.३३ कोटी रुपये आहे. नवीन AMG C 63 Coupe कारला पनामारिकाना ग्रिल आणि नवीन एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. कारच्या मागील भागात क्वाड एक्झॉस्ट आणि डिफ्यूझर देण्यात आले आहेत. नवीन AMG C 63 Coupe कार 3-स्पीच मल्टी-फंक्शन फ्लॅट-डाउन-स्टीयरिंग व्हील आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह आली आहे. कार्बन फायबरसह सेंटर कन्सोलच्या वर टचस्क्रीन इंफोटेनमेंट हेड-युनिट बसविले आहे. कारच्या इंटीरियरबद्दल सांगायचे तर यात काळा आणि लाल रंगाचा लेदर अपहोल्स्ट्री देण्यात आलं आहे. Mercedes-AMG C 63 Coupe ला ४.० लीटर, दुहेरी-टर्बो व्ही 8 इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 469 BHP आणि 650 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 9-स्पीड स्वयंचलित ट्रान्समिशन मिळते. कारमध्ये ड्रायव्हिंग, कम्फर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट +, रेस आणि वैयक्तिक असे सहा ड्रायव्हिंग मोड आहेत.

- Advertisement -

AMG C 63 Coupe

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -