Mi Fan Festival 2019: फक्त १ रूपयांत Note 7, Poco F1 खरेदी करण्याची संधी

फ्लॅश सेलच्या अंतर्गत १ रूपयांत Redmi Note 7 Pro, Poco F1, Mi Soundbar सोबत Mi LED TV 4A 32 इंच सारखे प्रोडक्ट एक रूपयांत खरेदी करता येतील.

Mumbai

चीनी स्मार्टफोन Xiaomi कंपनीने भारतात Mi Fan Festival 2019 जाहीर केले. या फेस्टिव्हलची सुरूवात ४ एप्रिल ते ६ एप्रिलपर्यंत असणार आहे. या फेस्टिव्हल दरम्यान ग्राहकांना बरेच प्रोडक्ट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फ्लॅश सेलच्या अंतर्गत १ रूपयांत Redmi Note 7 Pro, Poco F1, Mi Soundbar सोबत Mi LED TV 4A 32 इंच सारखे प्रोडक्ट एक रूपयांत खरेदी करता येतील. हा Mi Fan Festivalची सुरूवात रोज दूपारी २ वाजेपासून होईल तर, मिस्ट्री बॉक्स सेल संध्याकाळी ४ वाजता होईल.

Mystery Box Sale विक्रीमध्ये ग्राहकांना ९९ रूपयांत सरप्राईज प्रोडक्टस मिळू शकतात. त्यांची किंमत साधारण २४०० रूपयांपर्यंत असणार आहे. या सेलमधील इतर ऑफर या अधिक आकर्षक असून, Xiaomi कंपनीचा POCO F1 हा 6GB+128GB (internal memory) असणारा स्मार्टफोन २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

या शिवाय, Mi LED TV PRO 55 इंच असणारा टी.व्ही ४५ हजार ९९९ मध्ये खरेदी करता येईल. Redmi Note 5 Pro आणि Redmi Note 6 Pro वर अधिक सूट या फेस्टिव्हल मध्ये ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोनवर साधारण ५००० रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे.

Mi Fan Festival सेलमध्ये HDFC बॅंकेकडून ५ % इतका त्वरीत सवलत मिळणार आहे. याव्यतिरिक्त मोबिक्विकवर फ्लॅट १५ % सूट असेल. Mi Payद्वारे खरेदी केल्यावर ग्राहक Mi TV आणि Note 7 जिंकू शकतात.