भारतात Mi True Wireless Earphones 2 लवकरच लाँच होणार

भारतात लवकरच Mi True Wireless Earphones 2 Basic TWS ईयरबड्स लाँच करण्यात येणार आहे. दरम्यान कंपनीने नवीन ऑडिओ प्रॉडक्टचा टीझर जारी केला असून तो Mi True Wireless Earphones 2 Basic चा असल्याचे सांगितले जात आहे. या TWS इअरबड्सची जागतिक लाँचिंग यावर्षी जुलैमध्ये युरोपमध्ये करण्यात आली होती. शाओमीने थेट Mi True Wireless Earphones 2 Basic चे नाव लिहिले नसले तरी कंपनीच्या वेबसाइट आणि ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या टीझरवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की हे प्रॉडक्ट लवकरच लाँच होणार आहे.

शाओमीने MI इंडियाच्या ट्विटर अकाउंटवरून एक छोटा टीझर व्हिडिओ पोस्ट केला आहे. नवीन ऑडिओ प्रॉडक्टच्या लाँचिंग संदर्भात संकेत देण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रोडक्टची केवळ एक झलक दर्शविली गेली आहे. याव्यतिरिक्त, या इअरबड्स कंपनीच्या वेबसाइटवर कमिंग सून टॅगसह देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हे बड्स 15 ऑक्टोबरला इव्हेंटमध्ये Mi 10T 5G आणि Mi 10T Pro 5G सह लाँच केले जाऊ शकतात. जर शाओमीने Mi True Wireless Earphones 2 Basic लाँच केले तर युरोपमधील त्याची किंमत EUR 39.99 (जवळपास 3,400 रुपये) आहे.  या इयरबड्सच्या स्पेसिफिकेशन्सविषयी सांगायचे झाले तर, ते युरोपमध्ये 14.2 मिमी डायनॅमिक ड्राइव्हर्स् आणि एसबीसी / एएसी ऑडिओ कोडेक सपोर्टसह लाँच केले गेले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, हे एका चार्जनंतर 5 तास चालवता येऊ शकतात.


रिअलमीने जबरदस्त ‘हे’ इअरफोन भारतात केले लाँच