पुन्हा एकदा ट्विटर झालं होतं डाऊन; अडीच तासानंतर सेवा पूर्ववत

twitter down

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर पुन्हा एकदा डाऊन झालं. युजर्सना ट्विटरवर लॉग इन करता येत नाही आहे. जगभरातील कोट्यवधी युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ट्विटर डाऊन झाल्याने लाखो युजर्सना याचा फटका बसला. ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. ट्विटरकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबतचं अधिकृत निवेदन ट्विटरने दिलं आहे.

ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर कंपनीकडून निवेदन जारी करण्यात आलं. “तुमच्यातील अनेक जणांचे ट्विटर डाउन झालं आहे. आमच्या इंटर्नल सिस्टममध्ये काहीतरी समस्या होती. आम्ही निराकरण करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहोत. कोणत्याही हॅकिंग किंवा सुरक्षिततेच्या उल्लंघनामुळे ट्विटर डाऊन झालेलं नाही. माहितीनुसार ट्विटर १५ ऑक्टोबरला डाऊन झालं. ज्यामुळे वापरकर्त्यांना लॉग इन किंवा पोस्ट करण्यात समस्या येत होती. त्या काळात कोणीही पोस्ट करू शकला नाही. शोध घेतानाही कोणताही कंटेंट शो होत नव्हता. ज्यानंतर कंपनीने ट्विटरमध्ये हॅकिंगची कोणतीही समस्या नसल्याचं अधिकृत पोस्टद्वारे स्पष्ट केलं.

अडीच तासानंतर सेवा पूर्ववत

सुमारे अडीच तासानंतर ट्विटरची सेवा पूर्ववत झाली आहे. आता वापरकर्त्यांना कोणतीही समस्या येत नाही आहे. अधिकृतपणे माहिती सामायिक करताना कंपनीने सांगितलं की ट्विटर पूर्ववत झालं आहे. तुमच्या संयमाबद्दल सर्वांचे आभार.