घरटेक-वेकमायक्रोसॉफ्टचा बोलणारा 'सांगकाम्या'!

मायक्रोसॉफ्टचा बोलणारा ‘सांगकाम्या’!

Subscribe

पूर्वीच्या काळी घरोघरी ट्रिंग ट्रिंग वाजणारा टेलिफोन असायचा. जो फोन आपण कुठेही घेऊन जाऊ शकत नव्हतो. त्यानंतर कुठेही नेता येऊ शकणारा फिरता फोन म्हणजेच मोबाईल आला. या मोबाईलचे तंत्रज्ञान इतके वाढले कि ती एक मोठी क्रांतीच झाली. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे.

या मोबाईलमध्ये अनेक भन्नाट फीचर्स आपल्याला मिळतात. गुगल असिस्टंट हे गुगलचं असंच एक भन्नाट फीचर. तुम्ही त्याला काहीतरी काम सांगायचं आणि तो तुमच्यासाठी ते करणार! थोडक्यात हा तुमचा मोबाईलमधला ‘सांगकाम्या’च! पण आता हा गुगलचा ‘सांगकाम्या’ अजून हुशार आणि स्मार्ट झालाय! आता तो फक्त सांगकाम्या राहिला नाहीये!
मायक्रोसॉफ्टनं गुगलच्या या सांगकाम्याचं म्हणजेच गुगल असिस्टंटचं एक नवं व्हर्जन चीनमध्ये लाँच केलं आहे. यामध्ये हा गुगल असिस्टंट तुम्हाला चक्क कॉल करणार आहे! बसला ना धक्का! पण घाबरू नका. हा कोणताही भुताटकीचा प्रकार नाही. दुसऱ्या बाजूला कोणतीही व्यक्ती जरी नसली, तरी तुमच्याशी कोणीतरी बोलणार आहे. आणि ते कोणीतरी म्हणजेच आपला गुगल असिस्टंट!

- Advertisement -

मोबाईलच्या रुपातील सेलिब्रिटी

हा नव्या स्वरूपातला गुगल असिस्टंट तुमच्याशी सामान्य माणसासारखाच गप्पा मारतो. एवढंच नाही, तर तो टीव्ही बघतो, कविता करतो, जोक्स सांगतो आणि अजून बरंच काही करतो जे तुमचा कुणीही मित्र, भाऊ, बहीण, नातेवाईक करू शकतो. गुगल असिस्टंटचा हा चॅटबोट xiaoice (शाओआईस) हे तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यांनी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये या चॅटबॉटबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. या चॅटबॉटचे ५० लाखाहून अधिक मित्र आहेत. शिवाय या चॅटबॉटमध्ये १६ प्रकारचे चॅनल्स आहेत. ज्यामध्ये वी चॅटसारख्या प्रसिद्ध मेसेजिंग अॅप्सचाही वापर करून चॅटबॉटशी बोलता येऊ शकतं. सध्या ही सुविधा फक्त चीनमधील युजर्सना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

गूगलही करणार या अप्लिकेशनची चाचणी

दरम्यान, मायक्रोसॉफ्टकडे बॉट्सच्या माध्यमातून फोन कॉन्व्हर्सेशन हाताळणारं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे लवकरच इंग्रजीचा वापर करणाऱ्या इतर देशांमध्येही हे तंत्रज्ञान लाँच होण्याची शक्यता आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -