घरटेक-वेकमायक्रोसॉफ्ट भारतात सादर करणार 'सरफेस लॅपटॉप गो'

मायक्रोसॉफ्ट भारतात सादर करणार ‘सरफेस लॅपटॉप गो’

Subscribe

मायक्रोसॉफ्टचा सरफेस लॅपटॉप गो भारतात २२ जानेवारीपासून व्यावसायिक अधिकृत रीसेलर, अधिकृत रीटेल आणि ऑनलाईन भागीदारांच्या माध्यमातून ६३,४९९ रुपयांना उपलब्ध असेल.

मायक्रोसॉफ्टचा सरफेस लॅपटॉप गो भारतात २२ जानेवारीपासून व्यावसायिक अधिकृत रीसेलर, अधिकृत रीटेल आणि ऑनलाईन भागीदारांच्या माध्यमातून ६३,४९९ रुपयांना उपलब्ध असेल, अशी घोषणा आज कंपनीने केली. दररोजच्या कामकाजात दमदार अनुभव देण्यास सज्ज, अशा सरफेस लॅपटॉप गोमध्ये सरफेस लाइन-अप वृद्धिंगत करून, सरफेस लॅपटॉप ग्राहकांच्या पसंतीची वैशिष्ट्ये अधिक परवडणाऱ्या दरात देण्याच्या दृष्टीने याची रचना करण्यात आली आहे.

परफॉर्मन्स, बॅटरीचा कार्यकाळ, मूल्य आणि स्टाईल या सगळ्यांचा योग्य मेळ साधणारा सरफेस लॅपटॉप गो प्रीमिअम घटक वापरून तयार करण्यात आलेला, पोर्टेबल प्रोफाइलमधील अत्यंत हलक्या वजनाचा लॅपटॉप आहे. शिक्षणासाठी असो की कामासाठी, कॅमेरा, स्पीकर्स आणि माइक या गोष्टींचा हल्ली पूर्वीपेक्षा अधिक वापर होतो. कुटुंब, विद्यार्थी आणि व्यवसायांसाठी सरफेस लॅपटॉप गोमध्ये प्रीमिअम सरफेस लुक मिळतो, तोही अप्रतिम मूल्यात.

- Advertisement -

“हायब्रिड पद्धतीने काम करण्याची, शिकण्याची एक नवी पद्धत आपल्यासमोर वास्तव बनून आलेली असताना आपले काम, शाळा व आयुष्याशी जोडलेले राहाण्यात पीसी फार महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आजघडीला प्रत्येकाला पीसीची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती, कामाची पद्धत आणि स्थळासाठी सरफेस डिझाइन करणे हे आमचे लक्ष्य आहे. नव्या सरफेस लॅपटॉप गोसह आम्ही घराघरातील किंवा संस्थेतील प्रत्येक व्यक्तीला असा लॅपटॉप देऊ इच्छितो जो वापरणं ही तुमची गरज असेल असं नाही, तर तुम्हाला तो वापरावासा वाटेल. सरफेस लॅपटॉप गो हा आजवरचा सर्वात हलका आणि परवडणाऱ्या दरातील सरफेस लॅपटॉप आहे. आणि यात परफॉर्मन्स, बॅटरी कार्यकाळ व स्टाईलचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे,” असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजीव सोधी म्हणाले.

स्लीक डिझाइन आणि अतुलनीय मूल्य : आजवरचा सगळ्यात हलका म्हणजेच १.११ किग्रॅ. वजनाचा सरफेस लॅपटॉप आपल्या १२.४ इंची पिक्सेलसेन्स™ टचस्क्रीन डिस्प्ले, अचूक आणि आरामदायी टायपिंगच्या अनुभवासाठी १.३ मिमी. की ट्रॅव्हल असलेला फूल-साईज कीबोर्ड, मोठा प्रीसिजन ट्रॅकपॅड आणि दिवसभर चालणारी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग या वैशिष्ट्यांसह अप्रतिम मूल्य देऊ करतो. अरुंद बेझल्स आणि सरफेसची खास ओळख असलेल्या ३:२ प्रमाणातील स्क्रीन यामुळे तुम्हाला सहजरित्या काम करण्यासाठी अधिक जागा प्राप्त होते. प्लॅटिनम रंगातील हा सरफेस लॅपटॉप प्रत्येकाच्या उपयोगासाठी बनला आहे.

- Advertisement -

परिचित वैशिष्ट्ये आणि विश्वासार्ह सुरक्षितता : विंडोज हॅलोची सुरक्षितता आणि काही निवडक मॉडेल्सवर फिंगरप्रिंट रीडर पॉवर बटनासह वन टच साइन-इनसह वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीच्या विंडोजसह सुरुवात करता येईल. वन टच साइन-इनमुळे वनड्राइव्ह पर्सनल वॉल्ट फाइल्स वेगाने आणि सुरक्षितरित्या हाताळता येतात तसेच अधिक वेगवान कार्यक्षमताही लाभते. संगीत आणि व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी अप्रतिम आवाज आणि बिल्ट इन स्टडुडिओ माइक्स, ओम्नीसोनिक स्पीकर्स आणि डॉल्बी® ऑडिओ आणि ७२०p एचडी कॅमेऱ्यामुळे व्हिडीओ कॉल्सचा अनुभव अधिक समृद्ध होतो. मायक्रोसॉफ्ट एंडपॉईंट मॅनेजर आणि डिव्हाईस फर्मवेअर कन्फिगरेशन इंटरफेस (डीएफसीआय)सह प्रत्येक संस्थेच्या आयटी परिसंस्थेत क्लाऊड-फर्स्ट डिव्हाईस डीप्लॉयमेंट आणि मॅनेजमेंट देऊ करत सरफेस लॅपटॉप गो थेट कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता प्रदान करत आयटीमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी विंडो ऑटोपायलट देऊ करतो.

आवश्यक ॲप्ससह काम पूर्ण : वापरकर्त्यांना आजची कामे आणि उद्याच्या असाइनमेंट असं सगळं काही त्यांच्या आवडत्या ॲपच्या साथीने आणि दिवसभर चालणाऱ्या बॅटरीमुळे करणं शक्य होणार आहे. सरफेस लॅपटॉप गोमधील सर्व कन्फिगरेशन वेगवान आणि चटकन होणारी आहेत. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट ३६५ आणि ऑनलाइन स्टोरेजसारख्या क्लाऊड-कनेक्टेड अनुभवांचा पूर्ण फायदा घेता येतो. सरफेस लॅपटॉप गोमध्ये डिस्प्ले आणि ॲक्सेसरी सपोर्टसाठी USB-C® आणि USB-A पोर्ट्स आहेत तसेच आधुनिक १०th जेन इंटेल® क्वाड-कोअर™ प्रोसेसर आणि 16 GB RAM आणि 256 GB पर्यंतचे स्टोरेज असल्याने वापरकर्त्यांना ते कुठेही असले तरी कार्यक्षम आणि कनेक्टेड राहता येणार आहे.

उपलब्धता आणि किंमत

सरफेस लॅपटॉप गो २२ जानेवारीपासून व्यावसायिक अधिकृत रीसेलर, अधिकृत रीटेल आणि रिलायन्स डिजिटल आणि ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन भागीदारांकडे उपलब्ध आहे. दरमहा ८००० रु या रकमेपासून सुरू होणाऱ्या ९ महिन्यांसाठीच्या नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा यात आहेत. सरफेस लॅपटॉग गो खालील कन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -