घरटेक-वेकमायक्रोसॉफ्टचे सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 भारतात

मायक्रोसॉफ्टचे सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 भारतात

Subscribe

मायक्रोसॉफ्टने सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 भारतात आणले असून ई-कॉमर्स वेबसाईट (अमेझॉन आणि फ्लीपकार्ट) वर 28 जानेवारी 2019 पासून विक्रीस उपलब्ध झाले आहेत. तर क्रोमा, रिलायन्स, विजय सेल्स आणि इतर विक्रेत्यांच्या निवडक रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध राहील. अधिकृत रिसेलरच्या माध्यमातून ही उपकरणे कमर्शियल/एंटरप्राईज ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

सर्फेस डिव्हाईसेसची नेक्स्ट जनरेशन अद्वितीय अनुभव तर देतीलच शिवाय व्यक्तींसाठी प्रगत उत्पादकताही प्रदान करतील. सर्फेस, विंडोज आणि ऑफिस शक्तिसह क्लाउडसोबतची कनेक्ट असेल, ज्यामुळे वापरकर्त्याला सर्फेस उपकरणे सर्जनशीलतेसाठी पहिली पसंत ठरणार आहे.

- Advertisement -

सर्फेस अनुभव हा वापरकर्त्याला त्यांचे द्रष्टेपण आणि स्वप्न उभारायला मदत करते. सुंदर आणि स्टाईलिश हार्डवेअर हे वापरकर्त्याला सर्वोत्तम सर्जनशील पर्याय देणारे असून त्याचे देखणेपण लक्ष वेधून घेणारे ठरते. 2019मध्ये वापरकर्त्यांकरिता नवीन प्रगत तंत्र अवलंबत सर्फेस हा अभिनव कल्पना आणि जीवनाला विचार देणारा सुयोग्य साथीदार म्हणून पुढे येईल, असे मत मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कंट्री जनरल मॅनेजर – कन्झुमर अँड डिव्हाईसेस, प्रियदर्शी मोहपात्रा यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -