घरटेक-वेकमोबाईल युजर्स होत आहेत 'फबिंग'चे शिकार

मोबाईल युजर्स होत आहेत ‘फबिंग’चे शिकार

Subscribe

लोक 'फबिंग' या नव्या गोष्टीचे शिकार लोक होत असल्याचं समोर आलं आहे. 'फबिंग' हा मूळ ऑस्ट्रेलियन शब्द असून मोबाईलच्या आहारी जाऊन आपल्या समोर असणाऱ्या माणसांना दुर्लक्षित करणे असा त्याचा अर्थ आहे.

मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आता प्रत्येक जण मोबाईलच्या आहारीच गेला आहे. मोबाईलमुळं होणाऱ्या आजारांसंदर्भातील बातम्या सध्या समोर येत आहेत. मोबाईल युजर्स घर आणि ऑफिस इतकंच नाही तर आता बाथरूमध्येसुद्धा मोबाईलचा वापर करत आहेत. त्यामुळंच आता लोक ‘फबिंग’ या नव्या गोष्टीचे शिकार होत असल्याचं समोर आलं आहे. ‘फबिंग’ हा मूळ ऑस्ट्रेलियन शब्द असून मोबाईलच्या आहारी जाऊन आपल्या समोर असणाऱ्या माणसांना दुर्लक्षित करणे असा त्याचा अर्थ आहे.

काय आहे ‘फबिंग’?

कोणत्याही उत्सव, कौटुंबिक समारंभ, ऑफिशियल टूर अथवा अन्य कोणत्याही ठिकाणच्या लोकांना मोबाईलच्या नादात दुर्लक्षित केलं जातं. बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना मोबाईलवर मेसेज आल्यास, आपण समोरच्या व्यक्तीला दुर्लक्षित करतो आणि पुन्हा मोबाईलच्या जगात मशगुल होऊन जातो. समोरच्या माणसाकडे आपलं लक्षच राहात नाही. याला ‘फबिंग’ असं म्हटलं जातं.

- Advertisement -

रिसर्चमधून सिद्ध झालं लोकांचं वागणं

‘फबिंग’ म्हणजे नेमकं काय? हे जाणण्यासाठी ब्रिटनच्या केंट युनिर्व्हर्सिटीच्या वरोत चटपितायसुनोन्धनं शोधसंशोधन केलं आहे. स्वतःवरच त्यांनी हा रिसर्च केला. या शोधामध्ये त्याला जाणवणारे परिणाम हे आश्चर्यचकित करणारे होते. या समस्येमुळं लोकांच्या मानसिक स्थितीमध्ये सतत बदल होत असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे. आपल्याबरोबरील लोकांवरील विश्वासदेखील कमी होत असल्याचं समोर आलं. या समस्येमुळं आपल्याबरोबरील लोकांकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करण्यात येतं असं यातून सिद्ध झालं आहे. तसंच त्यानं आपल्या मित्रांवर केलेल्या रिसर्चमधूनदेखील त्यानं काही अंदाज बांधले. सुट्टी घेऊन मित्रांबरोबर थायलंडला गेला असता, सर्व मित्र आपापल्या मोबाईलवर व्यस्त असल्याचं त्याला जाणवलं. कोणी गेममध्ये, तर कोणी चॅटिंगमध्ये व्यस्त होता. यानंतर त्यानं मित्रांच्या वागण्यावर अभ्यास करून पीएचडी केली.

भारतामध्ये होत आहे ‘फबिंग’ची वाढ

या समस्येमुळं नकारात्मकता जास्त वाढीस लागली असल्याचं सिद्ध झालं आहे. समोरच्या व्यक्तीवर आपला विश्वास कमी होत असून लोकांप्रती असणारा जिव्हाळादेखील कमी होत आहे. दरम्यान, भारतामध्ये ‘फबिंग’ची वाढ होत आहे. बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जात असून आपला जीव गमावत असल्याचंही दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -