Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक युजर्सची सटकली, What's App नाही तर ‘Signal’ ला पसंती

युजर्सची सटकली, What’s App नाही तर ‘Signal’ ला पसंती

सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियातील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअप. आपल्या युजर्सना नेहमी काही तरी नवं फीचर्स आणणाऱ्या व्हॉट्सअपने यंदा मात्र नव्या अटी आणि शर्ती युजर्ससमोर मांडल्यात. नवी प्रायव्हसी पॉलिसी जर तुम्ही मान्य नसेल तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना ८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. असे असले तरी या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे सर्वच युजर्स व्हॉट्सअ‍ॅपविरोधात होते. दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवर सिग्नल अ‍ॅप वापरण्याचं आवाहन गेल्या काही दिवसांपूर्वी युजर्सना केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा भारतातील पेटीएम कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी भारतीय युजर्सना सिग्नल अ‍ॅप वापरण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट केले आणि युजर्सना म्हणाले, “भारतात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक त्यांच्या एकाधिकाराचा चुकीचा वापर करत असून लाखो युजर्सची प्रायव्हसी गृहीत धरली जातेय. आता आपण सिग्नल अ‍ॅप वापरण्यास सुरूवात करायला हवी” दरम्यान व्हॉट्सच्य़ा प्रायव्हेट पॉलिसीसंदर्भात युजर्समध्ये संभ्रम असतानाच सिग्नल अॅपच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली असून आता अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत भारतातील फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

सिग्नल वैयक्तिक डेटा विचारत नाही

सिग्नलने डिसेंबर २०२० मध्ये त्याच्या नव्या आवृत्तीसह ग्रुप कॉल लाँच केला आणि त्याला एन्क्रिप्टेड दिलं आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून केवळ फोन नंबर स्टोअर करतो. तर टेलिग्राम पर्सनल डेटा म्हणून केवळ कॉन्टॅक्ट इंफो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर ID मागतो. माहिती, संपर्क आणि वापरकर्ता आयडी विचारतो.

- Advertisement -

- Advertisement -