घरटेक-वेकमेड इन इंडिया रोबोटची अमेरिकेत भरारी

मेड इन इंडिया रोबोटची अमेरिकेत भरारी

Subscribe

नांदेडच्या तरूणाने बनवला जगातला सर्वात छोटा उडणारा रोबोट

दुष्काळग्रस्त म्हणूण परिचित असलेला मराठवाडा. संधीची कमतरता असलेला मात्र संधी मिळेल तेव्हा त्या संधीचे सोने करणारा हा मराठवाडा. नांदेडमधील योगेश चुकेवाड आणि त्याच्या टिमने मराठवाडा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा उर अभिमानाने भरून यावा असे कर्तृत्व केले आहे. टीम योगेशने नुकतंच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान, वायरलेस उडणाऱ्या रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन १९० मिलीग्राम आहे. दिसायला किटका सारखा असून या संशोधनाचे प्रक्षेपण KIRO-७ या अमेरिकन दूरचित्रवाहिनीवरून दाखवण्यात आले आहे.

असा आहे उडणारा रोबोट

- Advertisement -

या अनोख्या संशोधनाबद्दल विद्यापीठाचे संगणक शास्त्र विभागाचे डॉ. श्याम गोडलाकोटा म्हणतात की, या रोबोटसाठी एक लहान “ऑन बोर्ड” सर्किट वापरले आहे. या सर्किटमधील फोटोव्होडटाइक लेसरच्या सहाय्याने पंखाना वीजपुरवठा होतो. रोबोटच्या वजनात भर न पडता वीजपुरवठा करण्याचा हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. यापूर्वी असा वायरलेस रोबोट किटक केवळ स्वप्न समजाला जायचा. आमच्या या रोबोटने या कल्पनेला सत्यात उतरवले आहे, असे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या डॉ. सॉयर फूलर यांनी सांगितले. योहानेस जेम्स व विक्रम अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्किटवरचा मायक्रो कंट्रोलर ह्या त्या रोबोटच्या मेंदू सारखा असतो. तो त्याला कुठले पंख किती वेगात फडफडावयाचे याबाबत संदेश देतो.

संशोधक योगेश चुकेवाड सांगतो

- Advertisement -

अवघड मार्गातून स्वत:हून आपली वाट शोधण्याची क्षमता रोबोफ्लायमध्ये असावी असा आमचा प्रयत्न आहे. याचा उपयोग गॅस दुर्घटनेच्या वेळी तसेच पिकाची देखभाल करण्यासाठी होणार आहे.

योगेश चुकेवाड यांची पार्श्वभूमी

संशोधक योगेश चुकेवाड हा नांदेडमधील भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा जेष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत. योगेशचे शिक्षण नांदेडमधील महात्मा फुले विद्यालय येथे झाले. त्यांनी आय.आय.टी. पवई (मुंबई) येथे बी. टेक तर अमेरिकेत पदव्युत्तर पदवी -एम. एस. केले. आता तो युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्टन मध्ये संशोधन (पीएच.डी.) करत आहेत.

 

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -