घरटेक-वेकचंद्रावर आढळला बर्फ, नासाने दिली माहिती

चंद्रावर आढळला बर्फ, नासाने दिली माहिती

Subscribe

पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह चंद्र असून चंद्रावरील जीवसृष्टीचा शोध सुरु आहे. या आधी देखील चंद्रावर पाणी सदृश्य काही तरी आढळले होते. पण त्यावर शिक्कामोर्तब होत नव्हते.

चंद्रावर जीवसृष्टी आहे का? याचा शोध जगभरातील अंतराळ शास्त्रज्ञ घेत आहेत. त्यासाठी अनेक चांद्रमोहिमा देखील राबवल्या जात आहेत. या चांद्रमोहिमेदरम्यान चंद्रावर बर्फ आढळला आहे. त्यामुळे चंद्रावर पाणी आहे असे कळाल्यावर या ठिकाणी जीवसृष्टी देखील असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नासाने चंद्रावर बर्फ सापडल्याच्या बातमीवर मंगळवारी शिक्कामोर्तब केले. भारताने १० वर्षांपूर्वी चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान १ ने ही माहिती दिली असल्याचे नासाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सांगितले आहे.

‘चांद्रयान’ने दिली माहिती

चंद्राच्या पृथ्वीकडून दिसणाऱ्या भागाचा अभ्यास केल्यानंतर आता चंद्राच्या न पाहिलेल्या आणि उलगडलेल्या भागाचा अभ्यास सुरु आहे. चंद्राच्या पृथ्वीकडील भागापेक्षा चंद्राचा हा भाग अधिक वेगळा आहे. हा भाग काळोखा आणि अधिक थंड आहे. या भागातच गोठलेला बर्फ सापडल्याची माहिती या यानाने दिली आहे. गेली कित्येक लाखो वर्षे हा बर्फ या भागात असल्याची माहिती देखील दिली. इतकेच नाही तर यानाने बर्फावरून प्रतिबिंबित होणाऱ्या गुणधर्मांनाच टिपले नाही तर त्याच्या अणूंनी प्रकाश शोषून घेणारा विशिष्टपणा देखील टिपला. त्यामुळे चंद्रावरील पाणी आणि घन बर्फ यामधील फरक कळू शकला, असे नासाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -
ICE_ON_MOON
चंद्राच्या पृष्ठभागावरील गडद भाग हा थंड आहे. या ठिकाणी बर्फ सापडला आहे. नासाच्या मून मिनरलोलॉजी मॅपरने ही माहिती दिली आहे. (फौटो सौजन्य- नासा)

जीवसृष्टीची शक्यता

पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह चंद्र असून चंद्रावरील जीवसृष्टीचा शोध सुरु आहे. या आधी देखील चंद्रावर पाणी सदृश्य काही तरी आढळले होते. पण त्यावर शिक्कामोर्तब होत नव्हते. पाणी असल्यास जीवसृष्टी शक्य असल्याची शक्यताही वर्तवली होती. आता पाणी गोठलेल्या स्वरुपात आढळले म्हटल्यावर चंद्रावर जीवसृष्टी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१० वर्षापूर्वी पाठवले यान

चंद्रावर खरचं पाणी आहे का? याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे चांद्रयान १ चंद्र मोहिमेवर पाठविण्यात आले. २००८ साली इस्रोचे हे यान अवकाशात झेपावले. चंद्रावरील जीवसृष्टी हे यान शोधून काढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -