घरटेक-वेकनासा अॅपमुळं चंद्र-ताऱ्यांबरोबरही काढता येणार सेल्फी

नासा अॅपमुळं चंद्र-ताऱ्यांबरोबरही काढता येणार सेल्फी

Subscribe

सेल्फी अॅप आणि एक्सोप्लॅनेट एक्सकर्शंस व्हर्च्युअल रियालिटी अॅप हे दोन्ही नासाकडून लाँच करण्यात आले आहेत.

नासानं दोन व्हर्च्युअल रियालिटी अॅप विकसित केले आहेत. या अॅपमुळं तुम्हाला सुंदर अशा अवकाशातील वेगवेगळ्या ठिकाणची सेल्फी काढता येऊ शकते. या सेल्फी अॅप आणि एक्सोप्लॅनेट एक्सकर्शंस व्हर्च्युअल रियालिटी अॅप हे दोन्ही अॅप नासानं स्पिट्जर स्पेस टेलिस्कोपच्या लाँचला १५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे अॅप काढण्यात आलं आहे.

मिल्की वे बरोबर घेता येतील फोटो

नासाच्या म्हणण्याप्रमाणं, नव्या सेल्फी अॅपनं ओरियन नेबुला या मिल्की वे गॅलेक्सीसह सेल्फी घेता येऊ शकते. अॅपद्वारे या जागेची संपूर्ण माहितीदेखील मिळवता येऊ शकते. हे फोटो स्पिट्जरवरून घेता येतात. यामध्ये साधारण ३० चांगले फोटोज आहेत. नासा भविष्यात आपल्या इतर मिशनद्वारे खेचण्यात आलेले फोटोदेखील सेल्फीमध्ये जोडणार आहे. एक्सोप्लॅनेट एक्सकर्शंस व्हर्च्युअल रियालिटी अॅपद्वारे TRAPPIST-1 प्लॅनेटरी सिस्टिमची माहिती मिळू शकते. यामध्ये पुढे कसं जायचं, याची संपूर्ण माहिती देण्यात येते.

- Advertisement -

काय आहे नक्की TRAPPIST-1 प्लॅनेटरी सिस्टिम?

TRAPPIST-1 प्लॅनेटरी सिस्टिम ही अशी एक्सोप्लॅनेट सिस्टिम आहे ज्यामध्ये पृथ्वीच्या आकाराचे ७ प्लॅनेट्स आहेत. स्पिट्जरच्या मदतीनं या ग्रहांचा शोध घेणं शक्य झालं. तसंच त्याच्याद्वारे या ग्रहांबद्दल संपूर्ण माहितीदेखील मिळू शकली. TRAPPIST-1 प्लॅनेटरी सिस्टिमच्या नजरेपासून खूपच दूर आहे. नुसत्या डोळ्यांना पाहणं शक्य होऊ शकत नाही. 360 डिग्री व्हिडीओ स्पिट्जर युट्यूब पेजवर उपलब्ध आहे जी दर्शक आपल्या डेस्कटॉप, स्मार्टफोन किंवा Google कार्डबोर्डसारख्या स्मार्टफोन-आधारित 360-व्ह्यूअरवर व्हर्च्युअल TRAPPIST-1 सारखी प्रणाली एक्सप्लोर करण्याची परवानगी देतात. दरम्यान ऑक्युलस स्टोअरवरदेखील हे उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -