घरटेक-वेकनवी मुंबईत ४ जीचा सर्वाधिक स्पीड

नवी मुंबईत ४ जीचा सर्वाधिक स्पीड

Subscribe

सध्या देशात ४ जी नेटवर्कचा विस्तार वेगाने होत आहे. अशातच नवी मुंबईमध्ये ४ जीचा स्पीड हा सर्वाधिक ८.१ एमबीपीएस असल्याचे समोर आले आहे. तर, सर्वात कमी ४ जीचा वेग हा अलाहाबादमध्ये आहे. हा स्पीड ४. ० एमबीपीएस आहे. ही माहिती लंडनस्थित वायरलेस कव्हरेज मॅपिंग कंपनी ओपन सिग्नलने प्रसिद्ध केली आहे.

देशातील स्मार्टफोन वापरकर्त्यांना वेगवेगळ्या शहरात भिन्न स्पीड मिळत आहे. नवी मुंबईतील ४ जीचा स्पीड हा अलाहाबाद शहराच्या दुप्पट आहे. हैदराबादमध्ये सर्वात अधिक स्थिर असा ४ जीचा स्पीड मिळत आहे. तर, सर्वात अस्थिर असा ४ जी स्पीड हा अलाहाबाद शहरामध्येच ग्राहक अनुभवत आहेत. हा स्पीड वेगवेगळा येत असल्याचे ओपन सिग्नलचे तांत्रिक विश्लेषक फ्रान्सिस्को रिझाटो यांनी सांगितले.

- Advertisement -

सर्व शहरात दिवसभरात ४ जीचा स्पीड कमी होत जातो. रात्री १० वाजता सर्वात कमी ४ जीचा स्पीड मिळतो. याचवेळी अनेक जण इंटरनेटवरील मनोरंजन सेवेचा फायदा घेत असतात. जेव्हा नेटवर्क हे चांगले असते, तेव्हा ४ जीचा स्पीड १०.३ एमबीपीएसपर्यंत पोहोचतो. अशा स्थितीत इंदौरमध्ये सर्वात जास्त २१.६ एमबीपीएस स्पीड मिळत असल्याचे ओपन सिग्नलने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -