स्वस्तात मस्त नेटफ्लिक्स नवीन प्लॅन लाँच

हा नवीन प्लॅनचे नाव 'गो मोबाइल' असून हा फक्त एकच व्यक्ती वापरू शकणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त 480pवर एसटी कंटेंटचा सपोर्ट मिळणार आहे.

New Delhi

सध्या भारतातील नेटफ्लिक्स युझर्सची संख्या वाढत असल्यामुळे या दृष्टीकोनातून नेटफ्लिक्सने एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन स्वस्तात मस्त आहे. फक्त भारतातील नेटफ्लिक्स युझर्स करिता हा प्लॅन असणार आहे. या प्लॅनचे नाव ‘गो मोबाइल’ असे ठेवले आहे.

भारतामध्ये नेटफ्लिक्सचे युझर्स हे सबस्क्रीप्शन घेताना पण तीन ते चार जण मिळून घेत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना नेटफ्लिक्सचा वापर करता यावा म्हणून ‘गो मोबाइल’ हा प्लॅन नेटफ्लिक्सने आणला. १९९ रुपयांचा ‘गो मोबाइल प्लॅन’ हा नेटफ्लिक्सने लॉंच केला आहे.

नवीन प्लॅनची अधिक माहिती वाचा

या प्लॅनमध्ये ग्राहकांना केवळ एसडी क्वालिटी मिळणार आहे. तसेच हा प्लॅन फक्त मोबाइल वापरकर्त्यांसाठी असून एक महिन्याची त्याची मुदत आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त 480pवर एसटी कंटेंटचा सपोर्ट मिळणार आहे आणि HD, 720p किंवा यापेक्षा जास्त रिझोल्यूशनवर कंटेट दिसणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्लॅन फक्त एकच व्यक्ती वापरू शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात नेटफ्लिक्सने विविध प्लॅनची चाचणी केली. यामध्ये २५० रुपयांच्या प्लॅनची टेस्टिंग स्मार्टफोनसाठी करत होती.