Netflix चा आकर्षक प्लॅन; ६५ रूपयांत हजारो चित्रपट आणि वेब सिरीज

नव्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने हा ट्रायल प्लॅन देत आहे. ६५ रूपयाच्या प्लॅनसह युजर्संना एक महिना मोफत ट्रायल प्लॅन मिळणार

Mumbai
he lost his job due to amazon and netflix addiction

जर तुम्ही नेटफ्लिक्सचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नेटफ्लिक्सच्या व्हिडोओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने एक आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅनमध्ये ६५ रूपयांत हजारो चित्रपट आणि वेब सीरीज पाहता येणार आहे. हा ६५ रूपयांचा प्लॅन एक आठवड्याकरिता आहे. सध्या हा प्लॅन फक्त मोबाईल आणि टॅबलेटसाठी नेटफ्लिक्सने सादर केला आहे.

चार नवे प्लॅन सादर

नेटफ्लिक्स भारताच्या वेबसाईटसाठी तयार करण्यात आलेला ६५ रूपयांचा प्लॅन फक्त मोबाईलकरिता आहे. यामध्ये युजर्स फक्त एकावेळी एकच मोबाईल सेवेचा लाभ घेऊ शकतात. १२५ रूपयाच्या साधारण प्लॅनमध्ये युजर्स व्हिडिओ लॅपटॉप आणि टीव्हीवर अॅक्सेस करू शकतात. तसेच, १६५ रूपयाच्या प्लॅनमध्ये युजर्सना एकाचवेळी दोन स्किनवर अॅक्सेस करता येणार आहे. यासोबतच २०० रूपयांमध्ये ४ स्क्रीनचा अल्ट्रा प्लॅन सादर केला आहे. नेटफ्लिक्सचे हे प्लॅन एका आठवड्यासाठी आहे.

एक आठड्याच्या प्लॅनसह एक महिना फ्री

नव्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने हा ट्रायल प्लॅन देत आहे. ६५ रूपयाच्या प्लॅनसह युजर्संना एक महिना मोफत ट्रायल प्लॅन मिळणार आहे. म्हणजेच, युजर्स जर ६५ रूपयांचा प्लॅन घेणार असेल तर त्यास १ महिना ७ दिवस अशी मुदत मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here