घरटेक-वेकव्होडफोनचा नवा प्लान, १५४ रुपयांत १८० दिवस वैधता

व्होडफोनचा नवा प्लान, १५४ रुपयांत १८० दिवस वैधता

Subscribe

टेलिकॉम सेक्टरमध्ये आपला निभाव लागावा म्हणून टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लान आणून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच व्होडाफोनने १५४ रुपयांचा एक प्लान आणला आहे. हा प्लान १८० दिवस वैध असणार आहे. यापूर्वी कंपनीने १८९ आणि २७९ रुपयांचे दोन प्लान लाँच केले होते. ज्याची वैधता अनुक्रमे ५६ दिवस आणि ८४ दिवस होती. १५४ रुपयांचा प्लान ६ महिन्यांसाठी वैध असणार आहे.

हा प्लान कंपनीच्या अन्य अनलिमिटेड प्लानसारखा नाही. यात आपल्याला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारख्या सुविधा मिळणार नाहीत. १५४ रुपयांच्या या प्लानमध्ये व्हॉइस कॉलिंगसाठी काही मिनिटे देण्यात येणार असून, याचा वापर फक्त रात्रीच करता येणार आहे.

- Advertisement -

व्होडाफोनच्या या १५४ रुपयांच्या प्लानचे वैशिष्ठ्य म्हणजे याची वैधता १८० दिवसांची आहे. रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना ६०० लोकल ऑन-नेट (लोकल वोडाफोन ते वोडाफोन) रात्री वापरण्यासाठी काही मिनिटे देण्यात येणार आहेत. या मिनिटांचा वापर रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. याशिवाय लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी २.५ पैसे प्रति सेकंद चार्ज करण्यात येईल. डेटा डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला प्रति १० केबीसाठी ४ पैसे द्यावे लागतील. जर एसएमएस करायचे असतील तर या प्लानमध्ये लोकल एसएमएससाठी १ रुपया आणि एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये द्यावे लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -