घरटेक-वेक'यांना' मिळणार चंद्रावर उतरण्याची संधी

‘यांना’ मिळणार चंद्रावर उतरण्याची संधी

Subscribe

ट्रम्प प्रशासन या नव्या खासगी मोहिमेकडे एक संधी म्हणून पाहत आहे. कारण चंद्रावर उतरण्याची पुन्हा संधी मिळणे म्हणजे नासासाठी आणि अमेरिकेतील अंतराळ संशोधनासाठी एक चांगली संधी असणार आहे.

नील आर्मस्ट्राँगनेद चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अमेरिकेची ही महत्वाकांक्षी चांद्रमोहिम कायम लक्षात राहिली. आतापर्यंत नासाने अनेक चांद्रमोहिमा केल्या आहेत. त्यामुळे अंतराळ संशोधनात नासा नेहमीच अग्रेसर राहिले आहे. पण आता चंद्रावर जाण्याची संधी इतरांना देखील मिळणार आहे. कारण नासाने चंद्रावर जाण्यासाठी खासगी कंपन्यांची निवड केली आहे. ज्या पुढील काळात चंद्रावर उतरु शकणार आहेत.

खर्च होईल कमी

नासाच्या एका मोहिमेसाठी लाखो कोटींचा खर्च आहे. खासगी कंपन्यांना याची संधी दिली तर मोहिमांचा भार देखील कमी होणार आहे, असे ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ९ कंपन्यांची यामध्ये निवड करण्यात आली असल्याची माहिती नासाकडून देखील देण्यात आली आहे.

- Advertisement -
एलियनचा शोध लागला? नव्या पृथ्वीवर आहेत एलियन!

या नऊ कंपन्यांची नावे पुढील प्रमाणे

१. अॅस्ट्रोबॅटिक टेक्नॉलॉजी,पिट्सबर्ग
२. डीप स्पेस सिस्टीम ऑफ लिटलटॉन, कोलोरॅडो
३. ड्रेपर ऑफ कॅम्ब्रिज, मॅसेच्युट
४. फायरफ्लाय एअरोस्पेस ऑफ सेडेर पार्क, टेक्सास
५. इनट्युटिव्ह मशीन ऑफ हसटन
६. लॉकहिड मार्टिन ऑफ लिटलटन, कोलोरॅ़डो
७. मास्टेन स्पेस सिस्टीम ऑफ मोजाव, कॅलिफोर्निया
८. मुन एक्सप्रेस ऑफ केप कॅनावरेल, फ्लोरिडा
९. ऑर्बिट बियॉड ऑफ इडिसन, न्यू जर्सी

या कंपन्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. यासाठी खास नासा चंद्रावर उतरणार आहे. या कंपन्या या मोहिमेसाठी पैसा लावणार असून या २०२१ पर्यंत या मोहिमेसाठीचे यान अवकाशात झेपावेल असा विश्वास नासाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

१९७२ नंतर पहिल्यांदाच जाणार चंद्रावर

नासाने चंद्रावर पहिल्यांदा १९६९ साली गेले. अपोलो ११ हे यान गेले होते. नासाचे यान १९७२ साली आणखी एकदा चंद्रावर उतरले. पण त्यानंतर चंद्रावर उतरण्याची एकही मोहिम नासाकडून आखण्यात आली नाही.

वाचा- नासाच्या ‘इनसाईट’ या यानासोबत मंगळावर उतरले १ लाख भारतीय

नासासाठी संधी

ट्रम्प प्रशासन या नव्या खासगी मोहिमेकडे एक संधी म्हणून पाहत आहे. कारण चंद्रावर उतरण्याची पुन्हा संधी मिळणे म्हणजे नासासाठी आणि अमेरिकेतील अंतराळ संशोधनासाठी एक चांगली संधी असणार आहे. यामुळे चंद्राची अधिक माहिती घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -