केवळ ११९९ रुपयांत नोकियाचा ‘हा’ नवा फोन लाँच

Mumbai
NOKIA 105 FEATURE PHONE ANNOUNCED IN INDIA WITH 4 MB RAM AND 4 MB STORAGE FOR RS 1199
केवळ ११९९ रुपयांत नोकियाचा 'हा' नवा फोन लाँच

भारतात मंगळवारी नोकिया कंपनीने एक नवा फीचर फोन लाँच केला आहे. या नवीन फीचर फोनचे नाव ‘नोकिया 105’ असं आहे. कंपनीने या फोनची चौथी सीरिज लाँच केली आहे. या फोनमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली असून २५ दिवसांचा बॅटरीमुळे स्टँडबाय टाईम देण्यात आला आहे. ‘नोकिया 105’ची किंमत फक्त ११९९ रुपये इतकी आहे. देशभरात ‘नोकिया 105’ हा फोन ग्राहकांना नोकिया डॉट कॉम आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. नोकियाचा हा फोन पिंक, ब्ल्यू आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या फोनसोबत ‘नोकिया 220’ 4जी फोनही लाँच केला आहे.


हेही वाचा – आईशप्पथ! १० हजारात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला मोबाईल


नोकिया 105चे फिचर्स

या फोनचा डिस्प्ले १.७७ इंचाचा कलर स्क्रीन आहे. ‘नोकिया 105’मध्ये 4एमबी रॅम आणि 4जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच या फोनमध्ये २००० कॉन्टॅक्ट् नंबर आणि ५०० संदेश सेव्ह केले जाऊ शकतात. आइसलँड कीमॅट डायल पॅड, क्लासिक स्नेक गेम आणि कलर पॉलीकार्बोनेट बॉडी आहे. या मोबाइलमध्ये स्नेक गेम व्यतिरिक्त स्काय गिफ्ट, एअरस्ट्राइक, टेटरिस, निंजा अप, डेंजर डॅश आणि निट्रो रेसिंग हे गेन प्रीलोडेड आहेत. हा फीचर फोन सीरिज 30+OS वर कार्यरत असेल. तसेच ऑडियो जॅक ३.५ एमएम आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये कॅमेरा देण्यात आलेला नाही. ७४.०४ ग्रॅम वजनाचा हा फोन आहे. नोकिया 105मध्ये FM रेडिओसह LED टॉर्चलाइट देखील देण्यात आली आहे.

नोकिया 105च्या विक्रिची सुरुवात ही २० ऑगस्टपासून झाली आहे. या कंपनीने असा दावा केला आहे की, 800mAh क्षमतेची बॅटरी २५ दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि १४.४ तासांचा टॉकटाइम बॅकअप या फोनमध्ये देईल.


हेही वाचा – सॅमसंग गॅलक्सी नोट १०,नोट १० प्लस आज होणार लाँच