घरटेक-वेकनोकियाचा ‘हा’ स्मार्टफोन १२ हजारांनी स्वस्त झाला

नोकियाचा ‘हा’ स्मार्टफोन १२ हजारांनी स्वस्त झाला

Subscribe

4GB आणि 6GB रॅम अशा दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत ही कपात करण्यात आली आहे.

नोकिया ८.१ या स्मार्टफोनच्या भारतातील किंमतीत १२ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. 4GB आणि 6GB रॅम अशा दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत ही कपात करण्यात आली आहे. नव्या किंमतीमध्ये नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. नोकियाने स्मार्टफोन तयार करणाऱ्या HMD Global कंपनीने भारतात नोकिया ८.१ ची सुरूवातीची किंमत १५ हजार ९९९ रूपये करण्यात आली आहे.

या व्हेरिअंट्सवर मिळणार सूट

या स्मार्टफोनमध्ये 4GB आणि 64GB मॉडेल १५ हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. या व्हेरिअंट्सची किंमत २८ हजार ८३१ रूपये आहे. त्याच स्मार्टफोनचा 6GB आणि 128GB व्हेरिअंट आता २२ हजार ९९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ३१ हजार ९९९ रूपये आहे.

- Advertisement -

असे आहेत फीचर्स

  • ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर
  • ड्युअल रिअर कॅमरा सेटअप कार्ल जाइस ऑप्टिक्स सह
  • एफ/१.८ सह १२ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमरा
  • ऑप्टिकल इमेट स्टेबलायझेशन,
  • इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायझेशन आणि ड्युअल एलईडी फ्लॅश
  • १३ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, फिक्स्ड फोकस लेन्स
  • ३,५०० एमएएच ची बॅटरी, फास्ट चार्जिंग
  • ड्युअल सिम
  • अँड्रॉईड ९.० पाई तंत्रज्ञानावर आधारित
  • ६.१८ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले
  • अॅस्पेक्ट रेशो १८.७:९
  • स्क्रीन टु बॉडी रेशियो ८६.६ टक्के
  • समोरील वरच्या बाजूस डिस्प्ले नॉच
  • मेटल फ्रेम
  • कनेक्टिविटी: वाय-फाय, ब्लूटूथ, 4GB VoLTE सपोर्ट, एफएम रेडियो ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -