घरटेक-वेकनोकियाचा 'हा' स्मार्टफोन भारतात आज होणार लाँच

नोकियाचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात आज होणार लाँच

Subscribe

भारतात आज नोकियाचा ४.२ मोबाइल लाँच होणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा फोन पहिल्यांदा समोर आला होता

नोकिया कंपनी आपला स्मार्ट फोन Nokia 4.2 भारतात ७ मे रोजी लॉंच करणार आहे. याची घोषणा HMD Global ने ट्विटरवर टीझर प्रदर्शित करून केली. या टीझरमध्ये फोनच्या पॉवरबटनला LED नोटिफिकेशन्स लाईटसह एक डेडिकेटेड गूगल असिस्टेंट बटनला हाइलाइट करण्यात आले आहे. नोकिया ने फेब्रुवारीमध्ये स्पेन येथे आयोजित केलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये Nokia 3.2 आणि Nokia 4.2 हे फोन पहिल्यांदा समोर आले होते. या फोनची फीचर्स दाखवणारी काही टीझरही कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

- Advertisement -

Nokia 4.2 या स्मार्टफोनची वैशिष्ट्य

  • नोकिया ४.२ मध्ये ५.७१ इंचाचा एचडी डिस्प्ले
  • ७२०X१५२० पिक्सल रेझॉल्यूशनसहित एचडी डिस्प्ले
  • नोकिया ४.२ आउट ऑफ द बॉक्स अॅण्ड्राइड ९.० असून फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ एसओसी प्रोसेसर देण्यात आले आहे.
  • फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट असून फोन मेमरी ४०० जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
  • फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रिअर १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे.
    सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • फोनच्या बॅटरीची क्षमता ३०००एमएएच इतकी आहे.

नोकियाचा हा मोबाइल दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज वेरिएंट असलेल्या मोबाइलची किंमत ११ हजार ७०० रुपये आणि ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज असलेल्या मोबाइलची किंमत १३ हजार ८०० रुपये असण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -