घरटेक-वेकआता व्हॉट्सअॅपवर भरा 'वीज बिल'

आता व्हॉट्सअॅपवर भरा ‘वीज बिल’

Subscribe

येत्या काळात तुम्ही आता व्हॉट्सअॅपवर वीजबिल मिळवू शकणार आहात. ही नवीन प्रणाली लवकरच मुंबईत सुरु होणार आहे.

अनेकांना ऑनलाईन वीज बिल भरताना अडचणी येतात आणि त्यामुळे बरेचदा बिल वेळेवर भरले जात नाही. वेबसाईटवर बिलाचा आकडा नीट दिसत नाही अशी तक्रारही अनेकजण करतात. तुम्हालाही अडचणी येतात का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच चांगली आहे. आता चक्क व्हॉट्सअॅपवर तुम्ही तुमचं वीजबिल मिळवू शकणार आहात. व्हॉट्सअॅपच्या एका क्लीकवर तुम्ही तुमच्या वीज बिलाची देय राशी पाहू शकणार आहात.

डुप्लिकेट वीज बील देणार

व्हॉट्सअॅपने सुरू केलेली ही खास सुविधा सध्या केवळ दिल्लीच्या काही भांगांपूर्तीच मर्यादित आहे. एका खासगी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ‘BSES’ (दिल्ली इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी) ने दिलेल्या माहितीनुसार, ते ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर डुप्लिकेट वीज बिल देणार आहे. याधीच कंपनीने वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून डुप्लिकेट वीज बिल काढण्याची सुविधा सुरू केली आहे. मात्र ग्राहकांच्या सोयीसाठी आता व्हाट्सअँपवर ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचा सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -