भांडी घासणारा ‘स्क्रबिंग रोबोट’ !

Mumbai
dish washer robot
स्क्रबिंग रोबोट (सौजन्य-cnet.com)

‘रोबोट’ला अनेकदा माणसांचा मित्र म्हटलं गेलं आहे. आजवर जगभरातील अनेक कंपन्यांनी विवध प्रकारची कामं करणारे रोबोट्स बनवले आहेत. तर दुसरीकडे अनेक कंपन्या भविष्यात माणसांचीही जागा घेऊ शकतील अशा अत्याधुनिक रोबोट्सची निर्मिती करत आहेत. दरम्यान काही शास्त्रज्ञांनी नुकतीच एका आगळ्यावेगळ्या रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट चक्क घरतली सगळी प्राथमिक कामं करण्यात तुमची मदत करु शकतो. घरकाम करणाऱ्या बाईप्रमाणेच हा रोबोटही घरातली स्वच्छतेची कामं करु शकतो. मात्र, त्यातही भांडी घासणं ही या रोबोटची खासियत आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार अवघ्या काही मिनिटांमध्ये हा रोबोट खरकटी भांडी स्वच्छ करु शकतो.

 हेही वाचा: रोबोट चालणार ‘पॉपकॉर्न’च्या उर्जेवर !

एखाद्या उपकरणासाखा दिसणारा हा छोटो रोबोट जपानमध्ये तयार करण्यात आला आहे. या रोबोटचे वैज्ञानिक नाव ‘कुरु सारा वॉश’ असं असलं तरी त्याला जगभरात ‘स्क्रबिंग रोबोट’ याचं नावाने ओळखलं जातं. विशेष म्हणजे हा रोबोट डिश वॉश करण्याचं काम अतिशय सफाईदारपणे आणि वेगाने करतो. बघता बघता काही सेकंदांमध्ये तो सर्व भांडी घासून स्वच्छ करु शकतो. या उपकरणामध्ये लिक्वीड साबण आणि  भांड्यांमधील तेलकटपणा आणि चिकटपणा दूर करायला मदत करतो. बॅटरीवर चालणारा हा रोबोट कितीहीवेळा चार्ज करता येऊ शकतो. सध्या जपानमध्ये हे उपकरण ५ हजार ३०० रुपयांना उपलब्ध आहे. लवकरच हा भन्नाट रोबोट भारतीय बाजाराही विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचा: मलब्याखाली अडकलेल्यांना शोधणारा ‘अजब’ रोबोट !