लँडलाईन नंबरवरही आता चालणार व्हॉट्सअॅप

आपण आपल्या मोबाईल नंबरवर आतापर्यंत व्हॉटअॅपवर संवाद साधत होतो. पण आता यूजर्सना चॅटिंग आणखीन मजेशीर करण्यासाठी व्हॉट्सअॅप लँडलाईन नंबरवरूनही चालवता येणार आहे.

Mumbai
Now we can just whatsapp on landline
लँडलाईन नंबरवरही आता चालणार व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅप ही वृद्धांपासून तरूणांपर्यंत लोकप्रिय असणारी सोशल साइट आहे. व्हॉट्सअॅप हे एक संवाद साधण्याचे प्रभावी साधन आहे. युजर्सना एकमेकांशी जोडण्यासाठी आणि व्हॉट्सअॅपवरुन दुरवरील यूजर्सशी संवाद सांधण्यासाठी उपयुक्त ठरते. व्हॉट्सअॅपवर सातत्याने नवनवीन फीचर येत आहेत. मात्र, आता व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी नवे काहीतरी घेऊन आला आहे. आपण आपल्या मोबाईल नंबरवर आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर संवाद साधत होतात. पण आता यूजर्सना चॅटिंग आणखीन मजेशीर करण्यासाठी व्हॉट्सअॅप लँडलाईन नंबरवरूनही चालवता येणार आहे. यूजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवा असलेला व्हॉट्सअप कनेक्ट करू शकतात. हे करत असताना मोबाईलच्या नंबरची कुठेही गरज भासणार नाही आहे. या नव्या फिचरचा व्हाट्सअॅप बिझनेस अॅपला चांगलाच फायदा होणार आहे. व्यापारीवर्ग आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात वापर करू शकतात. तसेच योग्य पद्धतीने बिझनेस करू शकतो.

अशी असणार प्रक्रिया

१. सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर, टॅबलेट किंवा लॅपटॅपवर व्हॉट्सअॅप किंवा व्हाट्सएप बिझनेस अॅप डाऊनलोड करणे गरजेचे आहे.

२. व्हॉट्सअॅप डाऊनलोड केल्यानंतर यूजर्स कडे कंट्री कोड आणि मोबाईल नंबर टाकण्यास सांगते. त्यावेळी तिथे लँडलाइन नंबर टाकून एंटर करावे.

३. नंबर टाकल्यानंतर यूजर्सचा नंबर व्हेरिफाय प्रोसेस सुरू होईल. त्यामध्ये कॉल किंवा मॅसेज पाठवण्यात येईल. लँटलाइन नंबर असल्यामुळे कॉल मीवर क्लिक करा आणि त्यानंतर व्हेरिफाय प्रोसेस सुरू होईल.

४. व्हेरिफय होताना त्यांचा कॉल येईल. कॉलवर ६ डिजीटवाला एक व्हेरिफिकेशन कोड टाकून प्रोसेस करा. तसेच प्रोफाईल फोटो आणि नाव टाकून, सर्व डिटेल्स देऊन. आता व्हॉटअॅप पद्घतीने वापरू शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here